पहिल्याच दिवशी तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने परवाने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:44 AM2020-06-06T11:44:10+5:302020-06-06T11:55:41+5:30

पालिकेने परवानगी दिल्यानंतर तुळशीगाब बाजारपेठ शुक्रवारी सुरू झाली.

Action against traders in Tulshibag on the first day for break the rules.. | पहिल्याच दिवशी तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने परवाने जप्त

पहिल्याच दिवशी तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने परवाने जप्त

Next
ठळक मुद्देअतिक्रमण विभागाचा दणकासरकार व महापालिका प्रशासनाच्या आदेश व नियमांचे पालन करणे बंधनकारक

पुणे : कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून बंद असलेली तुळशीबाग आणि मंडई शुक्रवारी सुरु करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांना एकप्रकारे दिलासा मिळाला होता.. तुळशीबाग व मंडई सुरु करण्यास परवानगी दिली गेली असली तरी कोरोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टंन्सिंगसह सरकार व महापालिका प्रशासनाच्या आदेश व नियमांचे पालन करणे दुकानदार व नागरिकांना बंधनकारक असणार असेही बजावून सांगितले होते. मात्र,मात्र, या दोन्ही ठिकाणी पहिल्याच दिवशी फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला.पालिकेने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले गेले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दहा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या निदेर्शानुसार लॉकडाऊनमधून दिलासा देत महापालिकेने महात्मा फुले मंडई आणि तुळशीबाग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शुक्रवारपासून मंडईमधील २०० गाळे आणि तुळशीबागेतील दुकाने सुरू झाली आहेत. त्याचवेळी नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानांचे परवाने रद्द केले जाणार असल्याची तंबी अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली होती. महात्मा फुले मंडईमधील २०० गाळे धारकांनी महापालिकेकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांना प्रशासनाने फिजिकल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करणे, सॅनिटायझेशन आदी नियमांचे पालन करण्याच्या अटी घालून परवानगी दिली आहे. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पट्टे आखून देण्यात आले आहेत.
 पालिकेने परवानगी दिल्यानंतर तुळशीगाब बाजारपेठ शुक्रवारी सुरू झाली. तुळशीबागेत सुमारे ३५० दुकाने आहेत. तसेच २०० पथारीधारक आहेत. एका आड एक दिवस दुकान सुरू करण्याची रवानगी देण्यात आल्यानंतर तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमणे, ग्राहकांचे सॅनिटायझेशन करणे आणि शरीराचे तापमान तपासणे, असे नियोजन केल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले होते.

Web Title: Action against traders in Tulshibag on the first day for break the rules..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.