पुण्यात भीषण अपघात! पिकअपने ८ जणांना चिरडले; २ चिमुरड्यांसह ५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:06 AM2023-03-28T11:06:48+5:302023-03-28T11:08:54+5:30

पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. पिकअप वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता असं प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

A terrible accident in Pune! Pickup crushes 8 people; 5 deaths including 2 children | पुण्यात भीषण अपघात! पिकअपने ८ जणांना चिरडले; २ चिमुरड्यांसह ५ मृत्यू

पुण्यात भीषण अपघात! पिकअपने ८ जणांना चिरडले; २ चिमुरड्यांसह ५ मृत्यू

googlenewsNext

 पुणे - जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका पिकअप वाहनाने दुचाकीसह ८ लोकांना धडक दिली. या भयानक अपघातात २ मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात अहमदनगर-कल्याण हायवेवर लवणवाडी येथे घडली आहे. या अपघातातील सर्व शेतमजूर होते. सर्व पारनेर तालुक्यातील पलाशी वंकुटे गावातून शेतीचं काम पूर्ण करून नारायणगाव येथील घरी जात होते. याचवेळी नगर महामार्गावर एका पिकअपने दुचाकी वाहनासह ८ जणांना चिरडले. 

या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील चिमुरड्यासह एका व्यक्तीचा अपघातस्थळीच मृत्यू झाला तर अन्य ३ जण उपचारावेळी दगावले. मृतांमध्ये २ मुले, २ पुरुष आणि १ महिलेचा समावेश आहे. मृतकांमध्ये सुंदराबाई, गौरव मधे, नितीन मधे यांच्यासह मुलाचा समावेश आहे. मृतकांपैकी एकाचे नाव अद्याप कळू शकले नाही. अर्चना मधे आणि सुहास मधे हे दोघेही गंभीर जखमी आहेत. 

दरम्यान, पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. पिकअप वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना दिली. तर अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. 
 

Web Title: A terrible accident in Pune! Pickup crushes 8 people; 5 deaths including 2 children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात