लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, ३२ वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Published: January 18, 2024 01:47 PM2024-01-18T13:47:08+5:302024-01-18T13:48:49+5:30

हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वडगाव शेरी आणि गोवा येथील रिसॉर्टमध्ये घडला आहे...

A case has been registered against 32-year-old Isma for raping a young woman by luring her into marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, ३२ वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, ३२ वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तरुणीसोबत लग्न न करता दुसऱ्या मुलीसोबत लग्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक येथील तरुणावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वडगाव शेरी आणि गोवा येथील रिसॉर्टमध्ये घडला आहे.

याप्रकरणी वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय पीडित तरुणीने बुधवारी (दि. १७) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कृष्णा भरत जाधव (३२, रा. स्वामी समर्थ नगर, आडगाव शिवार, पंचवटी, नाशिक) याच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी नाशिक येथील एका बँकेत टेंप्ररी नोकरी करत होते. त्यावेळी त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, पीडित तरुणीला पुण्यात नोकरी लागल्याने ती पुण्यात वडगाव शेरी परिसरात राहण्यास आली. आरोपी कृष्णा जाधव याने फिर्यादी यांना पुण्यात भेटण्यासाठी येऊन लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर आरोपीने वारंवार पुण्यात तरुणीच्या राहत्या घरी येऊन तु मला खूप आवडते मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने आपल्या संबंधाबाबत कोणाला सांगितले तर तुझे तुकडे करीन अशी धमकी दिली. दरम्यान, आरोपीने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. याबाबत पीडित तरुणीला समजले असता, तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात जाऊन कृष्णा जाधव याच्या विरोधात तक्रार दाखल केली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक घोरपडे करत आहेत.

Web Title: A case has been registered against 32-year-old Isma for raping a young woman by luring her into marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.