बेल्ह्यात राज्यस्तरीय परिषदेत ८५० विद्यार्थी सहभागी

By admin | Published: January 12, 2017 02:13 AM2017-01-12T02:13:07+5:302017-01-12T02:13:07+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, बेल्हा (ता. जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ

850 students participating in the state level conference in Bela | बेल्ह्यात राज्यस्तरीय परिषदेत ८५० विद्यार्थी सहभागी

बेल्ह्यात राज्यस्तरीय परिषदेत ८५० विद्यार्थी सहभागी

Next

बेल्हा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, बेल्हा (ता. जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या काळात ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ याकडे असलेला विद्यार्थ्यांचा कल या विषयावर ही परिषद आयोजित केली होती.
या परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष व शैक्षणिक परिषदेचे सदस्य डॉ. सुनील कुटे आणि आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब गोजे, डॉ. दीपराज देशमुख, एमबीएचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव, प्रा. राजीव सावंत, प्रा. अर्जुन औटी, प्रदीप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेत संशोधन पेपर सादरीकरणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी आदी वेगवेगळ्या विद्यापीठांतून २०७ संशोधन पेपर आणि जवळपास ८५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कल्पकतेला वाव मिळावा, या हेतूने नवनवीन कल्पना-तंत्रज्ञानाची जोड देऊन समाजाभिमुख केलेल्या नवीन कलाकृती आणि यासारख्या विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित संकल्पनेचा आविष्कार या परिषदेत दिसून आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुनील कुटे म्हणाले, ‘‘मनात आलेली भन्नाट कल्पना सूत्रबद्धरीत्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून पेपरच्या माध्यमातून इतरांसमोर मांडण्याचे कौशल्य आत्मसात करा.’’
या परिषदेतील सहभागी संशोधन पेपरचे निकाल खालीलप्रमाणे :
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग : प्रथम क्रमांक- आरोटे तेजस्विनी, काळे धनवंतरी आणि रेश्मा नलावडे
यांना विभागून देण्यात आले. द्वितीय क्रमांक- सरिता जाधव, मेहेर
सायली, अश्विनी बुट्टे आणि भोर शीतल, मरगळ शुभांगी यांना विभागून देण्यात आला. तृतीय
क्रमांक- अश्विनी भोर, भावना घोलप, मेहेर मीनल आणि आहेर सुषमा, आंधळे अश्विनी यांना विभागून देण्यात आला.
सिव्हिल विभाग : प्रथम क्रमांक- विनायक कांदळकर, ए. एस. बाबर, ए. डी. थोरवे, पी. पी. बांदल, जी. आर. माने, ए. सी. धोत्रे, एस. ए. सणस यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- एस. बोडके, एस. बोरचटे, विकास घुले, संजय राजगुरू, ए. वि. राक्षे, टी. एस. औटी यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक- तुषार नवले, फिरोज सय्यद यांना विभागून देण्यात आला.
मेकॅनिकल विभाग : प्रथम क्रमांक- रिषभ प्रवीण बफणा, मनोज दातार, वृषभ डेंगळे, योगेश आरोटे, फाटांगरे सचिन यांना विभागातून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- शुभम भोर,अनघा दुराफे,अक्षय काळे,अश्विनी थोरात, मयूर यंगडाल यांना विभागातून देण्यात आला. तृतीय क्रमांक- अनिकेत आंद्रे, रेश्मा आवटे, आलिशा महाले, दिव्या पिंगळे, मनोज निकम विकास इसामे यांना विभागून देण्यात आला.
कॉम्पुटर विभाग : प्रथम क्रमांक- अंजुम इनामदार, कार्तिकी वहतोळे, विशाखा शिंदे, हर्षदा तोहाके, करिश्मा अजब, अश्विनी जाधव यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक- अमृता थिटे, गणेश थोरात, पायल हांडे, श्रद्वा शाह यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक- आरती वाकचौरे, अश्विनी भोर, स्वप्निल बाह्मणे, सायली औटी, प्रतीक्षा जाधव, मेघना गाडगे यांना विभागून देण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: 850 students participating in the state level conference in Bela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.