‘भांडारकर’वर हल्ला केलेल्या संभाजी ब्रिगेडच्या ६८ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 06:54 PM2017-10-27T18:54:34+5:302017-10-27T18:58:18+5:30

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ६८ कार्यकर्त्यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तब्बल तेरा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. 

68 freedom fighters of Sambhaji Brigade attacked 'Bhandarkar' | ‘भांडारकर’वर हल्ला केलेल्या संभाजी ब्रिगेडच्या ६८ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

‘भांडारकर’वर हल्ला केलेल्या संभाजी ब्रिगेडच्या ६८ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

Next
ठळक मुद्देभांडारकर संस्थेवर हल्ला केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ६८ कार्यकर्त्यांची खटल्यातून निर्दोष मुक्ततानिष्पाप ६८ आरोपींना सबळ पुरावा नसताना शिक्षा देता येणार नाही हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

पुणे : ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ६८ कार्यकर्त्यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजश्री जे घरत यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. तब्बल तेरा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला.     
‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकामध्ये  पान नं. ९३ वर माँ जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर जेम्स लेन याने आक्षेपार्ह लिखाण केले होते.  या लेखकाला आक्षेपार्ह लेखन करण्यासाठी भांडारकर संस्थेमधूनच जाणीवपूर्वक चुकीची माहिती पुरविण्यात आली होती. त्याच्या रोषातून दि. ५ जानेवारी २००४ रोजी संभाजी ब्रिगेडच्या सुमारे १००-१५० कार्यकर्त्यांनी भांडारकरवर नियोजनपूर्व हल्ला केला होता. भांडारकर संस्थेच्या इमारतीवर दगडफेक करून लाठ्या काठ्यांनी भांडारकर संस्थेच्या कार्यालयातील टाटा हॉल, ग्रंथालय, प्राकृत व हस्त लिखीत विभाग या मधील पुस्तकांचे रॅक, खुर्च्या, कपाटे, संगणके, फोटो फ्रेम, खिडक्या दरवाजांच्या काचा फोडून तसेच अनेक महत्त्वाच्या दुर्मिळ पुस्तकांचा, ग्रंथ, हस्तलिखिते यांचा नाश करून तसेच संस्थेच्या सरस्वती देवीची मूर्ती फोडून फार मोठे नुकसान केले होते. यामध्ये एकूण ७२ आरोपींना पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सकाळी ११ वाजता रंगेहाथ अटक केली होती. दरम्यान 5 आरोपींचे हा खटला चालू होण्यापूर्वीच निधन झाल्याने त्यांना न्यायालयाने या खटल्यातून वगळले. या घटनेनंतर ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकावर सरकारने बंदी घातली व वितरण तातडीने बंद केले होते. या घटनेत भांडारकर संस्थेचे १ कोटी ३० लाख २६ हजार २५ रूपयांचे नुकसान केले म्हणून भांडारकर भादंवि १४३, १४५, १४७, १४८, १४९, ३२३, ४२७, २९५, ३९५, १२०(ब), मुंबई पो. अ. क. ३७ (१) सह १३५ व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विरूपण कायदा कलम ३ अन्वये ७२ आरोपींच्या विरोधात दरोडा टाकणे,दंगल घडवून आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे असा दोषारोप ठेऊन आरोपींवर खटला दाखल करण्यात आला होता.   
या खटल्यात सरकार पक्षाचे वतीने न्यायालयात ९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आरोपींचा बचाव पूर्णपणे नकारार्थी होता. आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. मिलींद दत्तात्रय पवार म्हणाले की नेमका हल्ला कोणी केला,तसेच नेमकं नुकसान किती  झाले व कट कोणी रचला तसेच दरोडा टाकला हे आरोप सरकार पक्ष सिद्ध करू शकले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे दैवत आहे तर माँ जिजाबाई या मराठा समाजाची अस्मिता आहे. अशा दैवतांवर पद्धतशीरपणे शांत डोक्याने काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी जेम्स लेन या अमेरिकन लेखकाला हाताशी धरुन ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’या पुस्तकातून शिंतोडे उडवून  चारित्र्य हनन करण्याचा घाणेरडा प्रयत्न  केला व म्हणून त्या रागातून घटना घडली. पण घटना नेमकी कोणी केली किंवा कोणी घडवून आणली हे सरकार पक्ष सिद्ध करू शकलेले नाही. फक्त घटना घडली, संस्थेचे नुकसान झाले या कारणास्तव या निष्पाप ६८ आरोपींना सबळ पुरावा नसताना शिक्षा देता येणार नाही हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून सर्व ६८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 
अ‍ॅड. योगेश द पवार, अ‍ॅड .अजय ताकवणे, अ‍ॅड. प्रशांत जाधव व अ‍ॅड कुणाल तापकीर यांनी या खटल्यात मदत केली.

Web Title: 68 freedom fighters of Sambhaji Brigade attacked 'Bhandarkar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे