पुणे विभागातून होतो ५१ हजार कोटींचा प्राप्तीकर जमा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:55 PM2019-02-05T19:55:28+5:302019-02-05T20:00:47+5:30

गेल्या पाच वर्षांत पुणे विभागातून नवे ८ लाख करदाते जोडले गेले.

51 thousand crores imcome tax deposited from the Pune division | पुणे विभागातून होतो ५१ हजार कोटींचा प्राप्तीकर जमा 

पुणे विभागातून होतो ५१ हजार कोटींचा प्राप्तीकर जमा 

googlenewsNext
ठळक मुद्देकरदात्यांची संख्या वाढली : कर भरण्यात पुणे विभाग देशात पाचवा

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे विभागातून नवे ८ लाख करदाते जोडले गेले असून, विभागातून तब्बल ५१ हजार ६०० कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा झाला आहे. थेट कर जमा करणाऱ्या विभागांमध्ये पुणे विभाग हा पाचवा ठरला असल्याची माहिती मंगळवारी येथे देण्यात आली. 
प्राप्तीकर विभागाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान प्राप्तिकर विभागाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. प्राप्तिकर, कस्टम आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागातील अधिकारी या दोन दिवसीय महोत्सवात विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करणार आहेत. पुणे विभागाचे मुख्य प्राप्तीकर आयुक्त आशु जैन, कस्टम आणि जीएसटीचे मुख्य आयुक्त व्ही. एस. राव आणि कथ्थक नृत्यांग मनीषा साठे, प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी आणि महाराष्ट्र, गुजरात, गोवा येथील अधिकारी या वेळी उपस्थित होते. 
थेट करामध्ये गेल्या पाच वर्षांत दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. देशात २०१३-१४मध्ये ६.३८ लाख कोटी रुपयांचा महसूल थेट कराद्वारे जमा होत होता. त्यात आज आखेरीस १२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. देशपातळीवर करदात्यांच्या संख्येतही ३.७९ कोटींवरुन ६.८५ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. पुणे विभागामध्ये करदात्यांच्या संख्येत ८ लाखांनी वाढ झाली असून, कर वसुलीचे प्रमाणे ५१ हजार ६०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. करदात्यांच्या संख्येत वाढ करण्याचे उद्दीष्ट आहे. त्या दृष्टीने करदात्यांसाठी ई असेसमेंट आणि ई रिटर्न भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षांत तब्बल ९५ टक्के करदात्यांची पडताळणी इलेक्ट्रॉनिकली करण्यात आली असून, ९९ टक्के दात्यांचे करदात्यांचे अर्ज आॅनलाईन भरण्यात आले आहेत. या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविण्यात येत होते़. या कंपनीने हे काम दुसºया एका कंपनीला दिले होते़. त्यांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा किती तरी अधिक पटीने हे एसएमएस पाठविण्यात आले़ त्यामुळे संपूर्ण राज्यभर गोंधळ निर्माण झाला़.
या कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपल्या नवीन मोबाईल शॉपिंग अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविल्याचे सांगितले़. यावर कोणी संपर्क साधला तर त्याने त्या अ‍ॅपवरुन पुढील काळात काही खरेदी केली तर त्याला त्याच्या बिलात ही एक हजार रुपयांची रक्कम वळती केली जाणार होती़. मात्र, त्याचा सर्वांनी विपरित अर्थ काढला गेल्याने फसवणूकीचा हा प्रकार असल्याचा समज निर्माण झाला़. 
याबाबत सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले की, या कंपनीच्या अधिकाºयांना आम्ही चौकशीसाठी बोलावले आहे़ ते सांगतात, तसाच त्यांचा हेतू होता का याबाबत अधिक तपास करत आहोत़. त्याचा काही गैर हेतू होता का याची पडताळणी केली जात आहे़.  
..................

Web Title: 51 thousand crores imcome tax deposited from the Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.