बदली धोरणाविरोधात शिक्षक संघटनांचा ४ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 07:21 PM2017-10-25T19:21:20+5:302017-10-25T19:26:23+5:30

नवीन शिक्षक बदलीधोरणाच्या विरोधात शिक्षक संघटना ४ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय मोर्चा काढणार असून यात पुणे जिल्ह्यातील १० हजार शिक्षक सहभागी होणार आहेत.

On 4th November, the Association of Teachers' Organizations Against the Transfer Policy | बदली धोरणाविरोधात शिक्षक संघटनांचा ४ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बदली धोरणाविरोधात शिक्षक संघटनांचा ४ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Next
ठळक मुद्देतीन टप्प्यात आंदोलनाची दिशा, ४ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय मोर्चापुणे जिल्ह्यातील १० हजार शिक्षक होणार सहभागी : बाळासाहेब मारणेमागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरीय मोर्चा काढ्याचे नियोजन

पुणे : नवीन शिक्षक बदलीधोरणाच्या विरोधात पुण्यात सर्व शिक्षक संघटना एकत्रित आल्या असून तीन टप्प्यात त्यांनी आंदोलनाची दिशा ठरविली आहे. ४ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय मोर्चा काढण्यात येणार असून यात पुणे जिल्ह्यातील १० हजार शिक्षक सहभागी होणार असल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
सोमवारी सासवड येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या सभेत राज्यव्यापी आंदोलनाचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी पुण्यात बैैठक घेण्यात आली. या बैैठकीला त्यांनी सर्वच शिक्षक संघटनांना आमंत्रित केले होते. त्यानुसार बहुतांश शिक्षक संघटना आज एकत्रित आल्या व सर्वांनी या धोरणाविरोधात लढा देण्याचे ठरविले आहे. 
यावेळी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे अध्यक्ष काळूराम बोरसे, शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट)चे अध्यक्ष राजाराम वरुटे, मधुकर काठोळे, मागासवर्गीय संघटनेचे शामराव जवंजाळ, राजेश सुर्वे, काशिनाथ भोईर, चिंतामण वेळवडे, अंबादास वाजे, आप्पासाहेब कुल, एन. वाय. पाटील, उदय शिंदे, रावसाहेब रोहकले आदी राज्य पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण राज्यात एकाच वेळी भव्य मोर्चे करण्याचे नियोजन झाले.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पुण्यातील आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होणार असून १० हजार शिक्षक यात सहभागी होणार आहेत. 
यानंतर त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरीय मोर्चा काढ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील ४ लाख शिक्षक मोर्चा काढणार आहेत. आझाद मैदानावर हा मोर्चाचे संघटनांचे नियोजन आहे.  यानंतरही शासनाने धघेरण बदलले नाही तर मात्र शिक्षक सामुहिक रजेवर जावून शाळा बंद करतील असा इशारा आज या संघटनांनी दिला आहे. अंगणवाडी, एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदेलन शिक्षकांचा होईल असे, मारणे यांनी सांगितले. 

शिक्षक प्रतिनिधींशी संवादाची पद्धत बंद केल्याने शासनावर ही वेळ आली आहे. राज्यभरातून चार लाख शिक्षक एकाच वेळी रस्त्यावर उतरतील.
- बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ पुणे

सहभागी प्रमुख संघटना
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख संघटना
अखिल शिक्षक संघ
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना
जूनी पेन्शन हक्क संघटन
उर्दु शिक्षक संघटना
एकल शिक्षक संघटना 
स्वाभिमानी शिक्षक संघटना

प्रमुख मागण्या
नवीन बदली धोरण दुरुस्ती करावी
नवीन वरिष्ठ वेतनश्रेणी आदेश रद्द करावा
अंशदायी पेन्शन योजना बंद करून जूनी पेन्शन योजना लागू करावी
अनावश्यक आॅनलाईन कामे बंद करावी

Web Title: On 4th November, the Association of Teachers' Organizations Against the Transfer Policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.