सराईत गुन्हेगारांकडून ४० कारटेप जप्त, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 08:36 PM2018-04-07T20:36:11+5:302018-04-07T20:36:11+5:30

पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातून कारटेप, म्युझिक सिस्टिम चोरीला जात असल्याचे व हे गुन्हे ठराविक दिवशी व ठराविक वेळी घडत असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने दिशा ठरवून तपास सुुरु केला़.

40 cartape seized and four criminals arrested | सराईत गुन्हेगारांकडून ४० कारटेप जप्त, चौघांना अटक

सराईत गुन्हेगारांकडून ४० कारटेप जप्त, चौघांना अटक

Next
ठळक मुद्देसर्व जण मुळचे उत्तरप्रदेशातील राहणारे जवळपास १०० हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले़.

पुणे : वाहनांच्या काचा फोडून आतील कारटेप व म्युझिक सिस्टिम चोरणाऱ्या टोळीतील चौघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ४० कारटेप जप्त करण्यात आले आहेत़. साहिल जमील कुरेशी (वय २२, रा़ गोवंडी, मुंबई), अक्लाख हुसेन शेख (वय ३२), मोहम्मद जाहीर लोहार (वय ४१, रा़ तुर्भे, नवी मुंबई) आणि शौकत ईस्माईल कुरेशी (वय ४५, रा़ भेंडीबाजार, मुंबई) अशी चौघांची नावे आहेत़. हे सर्व जण मुळचे उत्तरप्रदेशातील राहणारे आहेत़. 
याबाबत पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार , पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातून कारटेप, म्युझिक सिस्टिम चोरीला जात असल्याचे व हे गुन्हे ठराविक दिवशी व ठराविक वेळी घडत असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने दिशा ठरवून तपास सुुरु केला़. त्यासाठी जवळपास १०० हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले़. त्यात एका मोटार ठराविक दिशेने येऊन गुन्हे करुन जात असल्याचे दिसून आले़. २५ मार्चला विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली़.त्यात मध्यरात्री अडीचच्या सुमारास एक संशयित मोटार येताना दिसली़.  मात्र ही मोटार भरधाव वेगाने दिघीच्या दिशेने निघून गेली़. तिच्या नंबरवरुन शोध घेतला असता ही गाडी मालकाचे नातेवाईक साहील कुरेशी यांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली़. त्याचा शोध घेत असताना त्याचा साथीदार मोहमंद जाहीद लोहार याला ताब्यात घेतले़. त्याच्याकडे तपास केला असता तो व इतर साथीदार मिळून कारपेट चोरी करीत असल्याची कबुली दिली़.
पोलीस शिपाई प्रफ्फुल मोरे आणि सुभाष आव्हाड यांना साहील कुरेशी व अक्लाख शेख यांची माहिती मिळाली़. त्यानुसार ३ एप्रिल रोजी दोघांना सापळा लावून पकडण्यात आले़. कुरेशीकडे गावठी पिस्टल व ६ काडतुसे मिळाली़. त्यांच्याकडे केलेल्या तपासात आरोपींकडून चोरीतील एकूण २० कारटेप, म्युझिक सिस्टिम जप्त केले आहे़. ते शौकत कुरेशी याला हे कारपेट विकत असत़ पोलिसांनी त्यालाही अटक करुन त्यांच्याकडून आणखी २० कारटेप जप्त केले आहे़. या चौंघांकडून ४ लाख ६३ हजार रुपयांचा माल हस्तगत केला असून त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आले आहेत़. अधिक तपासासाठी त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे़. 
ही कामगिरी उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील, दिलीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांनी केली आहे़.

.......................

वडिलही कारपेट चोरीत कोठडीत
कारपेट चोरीच्या या गुन्ह्यांमध्ये साहिल कुरेशी हा मुख्य सुत्रधार असून तो इतरांच्या मदतीने शनिवार, रविवारी पुण्यात येत असे़.मुंबईतून पहाटे २ ते ५ यावेळेत येऊन कारपेट, म्युझिक सिस्टिम चोरुन ते पुन्हा मुंबईला परत जात असत़. त्याचे वडिल हे कारपेट चोरीप्रकरणात सध्या गुजरात मधील पोलिसांच्या कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले़. त्यांनी एकूण ४५०  चोºया केल्याचे कबुल करतात़. पण तशी पोलिसांकडे गुन्ह्यांची नोंद आढळून आली नाही़. 

Web Title: 40 cartape seized and four criminals arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.