महाराष्ट्रात ३१ टक्के परकीय गुंतवणूक - हर्षदीप कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:14 AM2017-11-30T03:14:12+5:302017-11-30T03:14:23+5:30

‘‘देशात होणा-या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत आहे. कोणी काहीही म्हणू दे, आपले राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे,’’

 31 percent foreign investment in Maharashtra - Harshdeep Kamble | महाराष्ट्रात ३१ टक्के परकीय गुंतवणूक - हर्षदीप कांबळे

महाराष्ट्रात ३१ टक्के परकीय गुंतवणूक - हर्षदीप कांबळे

Next

पुणे : ‘‘देशात होणाºया एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत आहे. कोणी काहीही म्हणू दे, आपले राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे,’’ असे मत राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केले.
टाटा अ‍ॅडमायरर ग्रुपतर्फे आज भारतरत्न जे. आर. डी. टाटा स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कांबळे बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालक मंत्र गिरीश बापट, शहराचे माजी पोलीस सह-आयुक्त अशोक धिवरे आदी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, ‘‘राज्यात ५४३ मोठे प्रकल्प आले आहेत. पुण्यातही नवीन उद्योगांची भरभराट होत आहे. राज्यातील पूरक धोरणांमुळे गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. कोणी काही म्हटले तरीसुद्धा वास्तव हेच आहे, की देशात होणाºया एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. एक खिडकी योजनेच्या धर्तीवर चालणाºया ‘मैत्री’ उपक्रमाची अंमलबजावणी आता आम्ही जिल्हा स्तरावर करणार आहोत.’’
शहरांमध्ये होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी उद्योग-कंपन्यांच्या जवळच निवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत. पुण्यात हिंजवडी भागातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी अशाच उपायांचा अवलंब करावा, अशी सूचना राज्य सरकारला केली आहे, असेही कांबळे यांनी सांगितले.
बापट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद देव यांनी प्रास्ताविक केले.

आधुनिक भारताच्या जडणघडणीत टाटांचे स्थान अढळ आणि महत्त्वाचे आहे. कर्मचारी कल्याणाचा विचार जे. आर. डी. टाटा यांनी रुजवला. आज अनेक कामगार संघटना ज्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, त्या अनेक कामगारहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी टाटा समूहाने पहिल्यांदा केली आहे. केवळ उद्योगवाढ आणि कर्मचारीहित एवढेच नव्हे, तर टाटा यांनी सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली होती. त्यांच्या यशाचे गमक हे त्यांच्या शिस्तप्रिय वृत्तीत होते. - सुभाष देसाई,
उद्योगमंत्री

Web Title:  31 percent foreign investment in Maharashtra - Harshdeep Kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे