कंपनीतील डाटा चोरून २२ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:28 AM2018-03-17T00:28:45+5:302018-03-17T00:28:45+5:30

कंपनीतला डाटा चोरून स्वत:ची कंपनी सुरू करून प्लेसमेंट कंपनीची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बाणेर येथे उघडकीस आला. चतु:शृंगी पोलिसांनी तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

22 lakh fraud cheating in the company's data | कंपनीतील डाटा चोरून २२ लाखांची फसवणूक

कंपनीतील डाटा चोरून २२ लाखांची फसवणूक

Next

पुणे : कंपनीतला डाटा चोरून स्वत:ची कंपनी सुरू करून प्लेसमेंट कंपनीची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बाणेर येथे उघडकीस आला. चतु:शृंगी पोलिसांनी तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ज्या कंपनीत काम करीत होते, तेथूनचे ते स्वत:च्या फर्मचे कामकाज पाहत होते. यासाठी कंपनीचा डाटा, इंटरनेट आणि संगणकाचा वापरदेखील ते करीत असल्याचे समोर आले आहे.
बाणेर येथे एच. आर. रेमेडी इंडिया ही प्लेसमेंट कंपनी आहे. या कंपनीमध्ये आरोपी राहुल सोनटक्के (वय २६) व प्राची किनकर (वय २४) हे दोघे कामाला होते. राहुल गटप्रमुख, तर प्राची एचआर एक्झिक्युटिव्ह म्हणनू १९ जानेवारी २०१६ ते १७ नोव्हेंबर २०१७ दरम्यान नोकरीस होते. कंपनीकडे ग्राहकांचा सर्व डाटा व जॉब देणाऱ्या कंपन्यांचा डाटा कार्यालयातील संगणकामध्ये ठेवला होता. हा डाटा कंपनीचा गटप्रमुख व एचआर एक्झिक्युटिव्ह कामाकरिता उपलब्ध होता. डाटा गोपनीय असल्याने कर्मचाºयांना नोकरीला लावण्यापूर्वी लेखी हमीपत्र लिहून घेतले होते. डाटा हा फक्त कंपनीच्या हितासाठी वापरला जाईल, तसेच इतर कोणत्याही कंपनीला दिला जाणार नाही.

Web Title: 22 lakh fraud cheating in the company's data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.