सलाम ! ते दोघं मृत्यूनंतरही जगले, तिघांना दिलं जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 01:29 PM2017-08-18T13:29:13+5:302017-08-18T13:37:28+5:30

ब्रेन डेड झालेल्या दोघांनी मृत्यूनंतरही तिघांना जीवनदान दिलं आहे

2 brain dead persons give new lease of life to 3 patients | सलाम ! ते दोघं मृत्यूनंतरही जगले, तिघांना दिलं जीवनदान

सलाम ! ते दोघं मृत्यूनंतरही जगले, तिघांना दिलं जीवनदान

Next
ठळक मुद्देब्रेन डेड झालेल्या दोघांनी मृत्यूनंतरही तिघांना जीवनदान दिलंएखाद्या फुफ्फुसासाठी एवढं मोठं अंतर पार करण्याची देशातील ही पहिलीच घटना

पुणे, दि. 18 - ब्रेन डेड झालेल्या दोघांनी मृत्यूनंतरही तिघांना जीवनदान दिलं आहे. दोघांपैकी एका डोनरचं फुफ्फूस पुण्याहून चेन्नईच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं, तर ह्रदय मुंबईमधील एका गरजू पेशंटसाठी वापरण्यात आलं. चेन्नईमधील रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या फुफ्फुसासाठी एवढं मोठं अंतर पार करण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. 

पुण्यामधील रुबी रुग्णालयात 22 वर्षीय महिलेला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. 16 ऑगस्ट रोजी महिला डोक्यावर पडून जखमी झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. पत्नीच्या मृत्यूनंतर दुखा:चं आभाळ कोसळलं असतानाही त्यांच्या पतीने अवयवदान करण्याची तयारी दर्शवली. यानंतर तात्काळ त्यांचं फुफ्फूस चेन्नईच्या रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथील एका रुग्णाला याची तात्काळ गरज होती. 

पुण्यामधील रुबी हॉल रुग्णालयामधून चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे हे फुफ्फूस पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी यशस्वीरित्या फुफ्फुसाचं प्रत्यारोपण करत रुग्णाचा जीव वाचवला आहे. दान करण्यात आलेल्या एखाद्या फुफ्फुसासाठी पार करण्यात आलेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं अंतर होतं अशी माहिती चेन्नईमधील ग्लोबल हॉस्पिटलने दिली आहे. 

'पुण्यामधील रुबी हॉल रुग्णालयात फुफ्फुस असल्याची माहिती मिळताच आमच्य टीमने तात्काळ धाव घेतली. काही तपासणी केल्यानंतर हे फुफ्फुस पेशंटसाठी योग्य असल्याची माहिती मिळाली. पेशंटची परिस्थिती अत्यंत नाजूक होती, त्याला वेळेत मदत मिळाली नसती तर कदाचित त्यांना आपला जीव गमवावा लागला असता. सुदैवाने पुण्यातून आम्हाला ही मदत मिळाली, आणि पेशंटचा जीव वाचला', अशी माहिती ग्लोबल हॉस्पिटमधील डॉ संदिप यांनी दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 1.30 वाजता फुफ्फूस घेऊन आमची टीम रुग्णालयामधून निघाली होती. पहाटे 4.30 वाजता चेन्नई विमानतळावर टीम पोहोचली. यानंतर पुढील 15 मिनिटात फुफ्फूस रुग्णालयात पोहोचलं होतं. त्यानंतर अजिबात वेळ न दवडता पेशंटवर ऑपरेशन करत फुफ्फुसाचं प्रत्यारोपण करण्यात आलं असं डॉ संदिप यांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: 2 brain dead persons give new lease of life to 3 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.