अडीच वर्षात पीएमपीच्या 17 बर्निंग बसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 01:07 PM2018-11-01T13:07:06+5:302018-11-01T13:08:37+5:30

गेल्या अडीच वर्षांमध्ये पीएमपीच्या 17 बसेसला अाग लागल्याचे समाेर अाले अाहे.

17 buses were burnt in two and half years | अडीच वर्षात पीएमपीच्या 17 बर्निंग बसेस

अडीच वर्षात पीएमपीच्या 17 बर्निंग बसेस

googlenewsNext

पुणे :  संचेती पूलावर मार्गावर असताना पीएमपीच्या बसला अाग लागल्याची घटना ताजी असताना गेल्या अडीच वर्षात पीएमपीच्या एकूण 17 बसेसला मार्गावर असताना अाग लागल्याची माहिती समाेर अाली अाहे. यामध्ये पीएमपीच्या तसेच कंत्राट दाराच्या बसेसचा समावेश अाहे. इतक्या माेठ्या प्रमाणावर बसेसला अाग लागत असताना पीएमपी प्रशासनाला अद्याप या अाग लागण्याचे ठाेस कारण सापडत नसल्याने अाश्चर्य व्यक्त करण्यात येत अाहे. दरम्यान सातत्याने बसेसला अाग लागत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागत अाहे. 

    दाेन दिवसांपूर्वी विश्रांतवाडीहून काेथरुडकडे निघालेल्या पीएमपीच्या बसला संचेती पुलावर अाग लागली. चालकाच्या ही बाब तत्काळ लक्षात अाल्याने कुठलिही जीवित हानी झाली नाही. 20 एप्रिल 2016 पासून ते 31 अाॅक्टाेबर 2018 पर्यंत एकूण 17 बसेस अागीच्या भक्षस्थानी पडल्या अाहेत. यात ठेकेदाराकडून चालवण्यात येणाऱ्या बसेसची संख्या अधिक अाहे. बसेसची देखभाल दुरुस्ती याेग्य रितीने हाेत नसल्याचे चित्र अाहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातील ताफ्यात मालकीच्या 1,440 तर ठेकेदारांच्या 653 बसेस आहेत. यात जुन्या बसेसची संख्या लक्षणीय आहे. वारंवार बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याचे अादेश देण्यात अाल्यानंतरही बसेसची देखभाल याेग्यरितीने हाेत नसल्याचे समाेर अाले अाहे. परिणामी बसेसला मार्गावर अाग लागणे, बसेस बंद पडणे, ब्रेक फेल हाेणे याचे प्रमाण लक्षणिय वाढले अाहे. 

    दरम्यान सध्या ताफ्यात असणाऱ्या बसेसची अवस्था बिकट असल्याचे चित्र अाहे. अनेक बसेसच्या काचा फुटल्या अाहेत तर काही बसेसचे सीट तुटले अाहेत. बस कुठल्या मार्गावरची अाहे हे दर्शवणारे फलकही याेग्य ठिकाणी लावले जात नसल्याने प्रवाशांना रात्रीच्या वेळी बस अाेळखण्यास अडचण निर्माण हाेत अाहे. जुन्या बसेसमधून माेठ्याप्रमाणावर धूर फेकला जात असल्याने प्रदुषणातही वाढ हाेत अाहे.

Web Title: 17 buses were burnt in two and half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.