काेंबड्यांची झुंज 16 जणांना पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 09:49 PM2018-08-16T21:49:40+5:302018-08-16T21:51:14+5:30

काेबड्यांची झुंझ लावून जुगार खेळणाऱ्या 16 जणांना पाेलिसांनी अटक केली अाहे.

16 people arrested for taking cock fight | काेंबड्यांची झुंज 16 जणांना पडली महागात

काेंबड्यांची झुंज 16 जणांना पडली महागात

Next

पुणे : ग्रामीण भागात कोंबड्याची झुंज लावली जात असल्याचे व्हिडिओ आपण नेहमी पाहतो़ पण, पुणे शहरापासून जवळच असलेल्या भुगाव येथील मुकाईवाडी गावातील निसर्ग लॉज येथे कोंबड्याची झुंज लावून त्यावर जुगार खेळला जात होता़. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेथे छापा घालून १६ जणांना पकडले आहे़ त्यांच्याकडून जुगाराची साधने व तब्बल १ लाख ५ हजार ६९० रुपये जप्त केले आहेत़.
 
    रात्रीच्या वेळी कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली़ पोलीस अधीक्षक संदीप पाटील व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मुकाईवाडी येथील निसर्ग लॉजवर पहाटे २ वाजता छापा घातला़ तेथे ८ ते १० कोंबडे होते़ या सर्व कोंबड्यांना प्रशिक्षित केले असते़ त्यांच्या पायाच्या पंजाला ब्लेड बांधले जाते़ मग त्यांची झुंज लावली जाते़ त्यांच्यापैकी कोणता कोंबडा जिंकेल असे वाटते त्यावर इतर जण पैसे लावतात़ कोंबडे हे हवेत उडी मारुन दुसऱ्या कोंबड्यावर पंजा मारतात़ पंजाला ब्लेड लावलेले असल्याने त्यात कोंबडे जखमी होतात़.


     राजेश रई, अरुण सरोदे, प्रकाश पुजारी, विश्वनाथ शेट्टी, गंगाधर कोरायन, हरीश पुजारी, नारायण पवार, सुरंदर हेगडे, संदीप शेट्टी, वासू खरकेरा, रविंदर सिंग, मकरंद घाडगे, सायन छत्री, कुबेर अधिकारी, बाळकृष्ण इलतवारी, दयानंद पुजारी हे त्यांचे साथीदार प्रसन्ना शेट्टी, अण्णा यांनी मिळून ही कोंबड्याची झुंज लावली होती़ त्यांनी कोंबड्यांना निदर्यतेने वागून त्यांचे झुंजीवर पैसे लावून जुगार खेळल्याबदद्ल पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ तसेच निसर्ग लॉजचे चालक प्रसन्न शेट्टी  व त्यांचा मॅनेजर गंगाधर कोरायन या दोघांनी लॉजवर विना परवाना विदेशी दारुच्या ४१ बाटल्या बाळगल्याचे आढळून आले असून त्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

Web Title: 16 people arrested for taking cock fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.