देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 03:53 AM2019-04-20T03:53:08+5:302019-04-20T03:53:54+5:30

यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती.

In Uttar Pradesh, which is the country's political laboratory, BJP's Litmus test | देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट

देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट

Next

- एन. के. सिंह
लखनऊ : यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती. या वेळी तसेच घडणार की समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोक दल यांची आघाडी भाजपला चितपट करेल, यावर केंद्रातील सत्तेची गणिते ठरणार आहेत.
अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर ११ महिन्यांनी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या वेळी उत्तर प्रदेशसह देशभर हिंदुत्वाचे वातावरण होते. अशा स्थितीत सप व बसप यांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या होत्या. त्या वेळी सप-बसप आघाडीला १७६ जागा (सपला ११0 व बसपला ६७) मिळाल्या होत्या. सरकार स्थापनेसाठी २१३ जागांची गरज होती. भाजपला १७६ जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी सपला २१.८0 टक्के तर बसपला १९.६४ टक्के मते मिळाली होती. आधीच्या निवडणुकांच्या तुलनेत दोघांच्या मतांमध्ये मिळून १२ टक्क्यांची वाढ दिसली होती. भाजपला मिळालेली मते ३२.५२ टक्के इतकी होती.
त्याच सप-बसपची आता आघाडी आहे. त्यात रालोदही सहभागी आहे. त्यानंतर २0१४ च्या लोकसभा व २0१७ सालच्या विधानसभा निवडणुकांत या दोन पक्षांना मिळालेली मते पाहिली तर ती भाजपच्या आसपास वा त्याहून अधिकच आहेत. हे गणित लक्षात घेतले, तर यंदा उत्तर प्रदेशात भाजपला ५0 जागांचे नुकसान होऊ शकते. म्हणजेच २0१४ पेक्षा ५0 जागा कमी मिळू शकतात. हा फॉर्म्युला यशस्वी झाला, तर अन्य राज्यांतील प्रादेशिक पक्षही त्याची पुनरावृत्ती करू शकतील.
भाजप सत्तेवर आल्यानंतर गाय, बैल, भारतमाता यांच्या नावाने अल्पसंख्याक, दलित व मागास जातींमध्ये भीतीची भावना निर्माण करण्यात आली. दलितांना लग्नाची वरात आपल्या घरासमोरून काढू नये, असे उच्च जातींच्या मंडळींनी बजावल्याचीही काही उदाहरणे आहेत.
एके ठिकाणी घोडीवर दलित वर बसल्याने संतापून उच्च जातींतील एकाने त्याच्यावर बंदूकच रोखली होती. त्यामुळे या जाती भाजपवर नाराज आहेत. भाजप आपले आरक्षण पूर्णपणे रद्द करेल, अशीही भीती मागास जातींमध्ये आहे. त्यामुळे या जाती सप-बसपच्या मागे उभ्या दिसत आहेत. केवळ मतांची टक्केवारीच नव्हे, तर जे रसायन तयार झाले आहे, तेही भाजपच्या विरोधात दिसत आहे. आपल्याकडे फर्स्ट पास्ट द पोस्ट नावाचा एक खेळ आहे. त्यात खांबापाशी जो आधी पोहोचतो, तोच जिंकतो. निवडणुकीच्या खेळात मात्र दोन अधिक दोन म्हणजे चारच नव्हे, तर आठही होऊ शकतात.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
>सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपले वडील मुलायमसिंह व बसपच्या प्रमुख मायावती यांच्यातील २५ वर्षांपासूनचे वैर संपवून दाखवले आहे. त्यांच्यातील हा समझोता निवडणूक निकालांत त्यांना फायदा मिळवून देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
दोन प्रादेशिक पक्षांतील हा समझोताच मुळी देशातील राजकारणातील नवा व वेगळा प्रयोग आहे.

Web Title: In Uttar Pradesh, which is the country's political laboratory, BJP's Litmus test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.