‘सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते’, चंद्रकांत पाटलांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 06:22 AM2021-02-15T06:22:56+5:302021-02-15T06:27:39+5:30

Chandrakant Patil : पाटील म्हणाले, राज्यातील एक मंत्री अनैतिक संबंधाबद्दलची कबुली देतो. दुसऱ्या एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्येशी जोडले जाते. ड्रग प्रकरणातही दिग्गज नेत्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येते.

‘State government's relationship with all kinds of crimes', criticizes Chandrakant Patil | ‘सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते’, चंद्रकांत पाटलांची टीका 

‘सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते’, चंद्रकांत पाटलांची टीका 

Next

सांगली : सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी राज्य सरकारचे नाते जोडले गेले आहे. सत्ताधाऱ्यांनी शिवशाहीऐवजी केवळ ठोकशाही पद्धतीने राज्य चालविण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
पाटील म्हणाले, राज्यातील एक मंत्री अनैतिक संबंधाबद्दलची कबुली देतो. दुसऱ्या एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या आत्महत्येशी जोडले जाते. ड्रग प्रकरणातही दिग्गज नेत्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येते. एका मंत्र्याच्या बंगल्यात तरुणाला मारहाण केली जाते. अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सरकारमधील मंत्री व त्यांचे नातलग बदनाम होत असताना सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी दडपशाहीचे दर्शन घडवीत आहे. राज्यामध्ये जे काही चालले आहे, ते राज्याच्या प्रतिमेला तडा देणारे आहे.
निष्क्रियतेचीही सरकारने परिसीमा गाठली आहे. कोरोनाच्या उपाययोजनांवर एक रुपयाचाही खर्च राज्य सरकारने केला नाही. पीपीई किटपासून लसीकरणापर्यंतचा सर्व खर्च केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला केंद्राकडे बोट करण्याचा कोणताही अधिकार नाही. या सरकारने शेतकरी, महिला, मजूर, कामगार, कर्मचारी यांच्यासाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारची सध्याची अवस्था ही ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली आहे.

पवारांना माझ्याशिवाय करमत नाही 
शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही. मी त्यांच्याविषयी काही बोललो नाही, तरी ते माझ्याविषयी काही तरी बोलत असतात. त्यांनी राज्यातील बदनाम मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. त्यांना आम्ही परिपक्व नेते म्हणतो. तरीही ते काही कारवाई करीत नाहीत, असेही पाटील म्हणाले.

Web Title: ‘State government's relationship with all kinds of crimes', criticizes Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.