Lok Sabha Election 2019 : संजय निरुपमांना 'उत्तर पश्चिम'ची उमेदवारी, मिलिंद देवरांकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 07:39 PM2019-03-25T19:39:46+5:302019-03-25T19:57:59+5:30

काँग्रेस पक्षानं मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले आहेत.

Sanjay Nirupam candidate of Mumbai north west, Milind Deora new mumbai congress president | Lok Sabha Election 2019 : संजय निरुपमांना 'उत्तर पश्चिम'ची उमेदवारी, मिलिंद देवरांकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी

Lok Sabha Election 2019 : संजय निरुपमांना 'उत्तर पश्चिम'ची उमेदवारी, मिलिंद देवरांकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी

googlenewsNext

मुंबईः काँग्रेस पक्षानं मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. काँग्रेसनं संजय निरुपम यांना पायउतार करत त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवले आहे. तसेच संजय निरुपम यांनाही नाराज न करता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री व दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा हे आता मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत. मात्र निरुपम यांच्या उत्तर पश्चिम लोकसभा उमेदवारीला राहुल गांधी यांनी मान्यता दिली आहे.

अध्यक्ष म्हणून मनमानी कारभार करणाऱ्या निरुपम यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यातच मुंबई काँग्रेसच्या गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या कार्यकरिणीत त्यांनी आपल्या 24 समर्थकांची वर्णी लावली होती. तसेच त्यांच्या विरोधात कामत व देवरा गटांनी व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास देवरा व कामत गटांचा कडाडून विरोध होता. निरुपम यांना येथून तिकीट देऊ नये, अशी भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी घेतली होती. त्यातून सुवर्णमध्य काढत काँग्रेसनं मिलिंद देवरांकडेची मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं आहे. तर दुसरीकडे संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.


काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचा देखील निरुपम यांच्या नावाला विरोध होता. या समितीतील अहमद पटेल, के. सी, वेणुगोपाळ आणि काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील मुंबई काँग्रेसमधून निरुपम यांना तिकीट देण्यास काँग्रेसमधील अंतर्गत विरोध असल्याचा अहवाल दिला होता. तर येथून काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या उमेदवारीला येथून पसंती देण्यात आली होती. परंतु अखेर निरुपम यांनाच ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

Web Title: Sanjay Nirupam candidate of Mumbai north west, Milind Deora new mumbai congress president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.