Rohit Pawar written post about Parth Pawar on facebook | रोहित पवारांचे ''बंधुप्रेम'' : पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर केली ''ही'' पोस्ट 
रोहित पवारांचे ''बंधुप्रेम'' : पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर केली ''ही'' पोस्ट 

पुणे : मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या शरद पवारांच्या नातवंडांपैकी असलेल्या रोहित पवार यांनी पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाल्यावर आनंद व्यक्त केला आहे. फेसबुकवर केलेल्या या पोस्टमुळे या दोघांमध्ये मतभेद होते की फक्त वावड्या होत्या अशीही चर्चा सुरु झाली आहे. 

   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी माझ्या ऐवजी पार्थ निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. यानंतर रोहित यांनी आजोबा शरद पवार यांनी निवडणूक लढायला हवी अशा अर्थाची पोस्ट फेसबुकवर केली होती. या पोस्टनंतर पार्थ आणि रोहितमध्ये सत्तासंघर्ष असल्याचा अंदाज अनेकांनी लावला होता. मात्र त्याच दिवशी असे काहीही नसल्याचे रोहित यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज पार्थ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर रोहित यांनी खास पोस्ट करून त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा देत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा काय म्हणाले रोहित पवार :


Web Title: Rohit Pawar written post about Parth Pawar on facebook
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.