"डिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील वाझे, खोदून चौकशी केली तर…’’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 05:07 PM2021-07-03T17:07:22+5:302021-07-03T17:09:28+5:30

Dino Morea: ईडीने अभिनेता डिनो मोरिया आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयावर केलेल्या कारवाईनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी डिनो मोरियावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Nitesh Rane Says, "Dino Morea is a Mumbai Municipal Corporation Waze, if you dig and inquire lot of penguins will come out running" | "डिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील वाझे, खोदून चौकशी केली तर…’’

"डिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील वाझे, खोदून चौकशी केली तर…’’

Next

मुंबई - गुजरातमधील व्यावसायिक असलेल्या संदेसरा बंधूंनी केलेल्या १४ हजार ५०० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्यासंबंधीच्या एका प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. दरम्यान ईडीने केलेल्या कारवाईनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी डिनो मोरियावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (Nitesh Rane Says, "Dino Morea is a Mumbai Municipal Corporation Waze, if you dig and inquire lot of penguins will come out running")

नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात की, डिनो हा मुंबई महानगरपालिकेतील वाझे आहे. या प्रकरणात अधिक चौकशी केली तर अनेक पेंग्विनची प्रकरणे उजेडात येतील. आमच्याकडे तसे पुरावे आहेत.

दरम्यान, ईडीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या तपासात संदेसरा बंधू आणि इरफान सिद्धिकी यांच्यातील आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली. त्याबरोबरच डिनो मोरिया हा सुद्धा यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की ज्या व्यवहारांना गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये मानले गेले आहे त्या व्यवहारांएवढी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणामध्ये १४ हजार ५०० कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे. या प्रकरणात आरोपी स्टर्लिंग बायोटेक आणि त्याचे मुख्य प्रमोटर आणि संचालकांमधील नितीन जयंतीलाल संदेसरा, चेतनकुमार जयंतीलाल संदेसरा आणि दिप्ती संदेसरा फरार आहेत. नितीन आणि चेतनकुमार हे भाऊ आहेत. ते २०१७ मध्ये अन्य लोकांसह फरार झाले आहेत.  

Web Title: Nitesh Rane Says, "Dino Morea is a Mumbai Municipal Corporation Waze, if you dig and inquire lot of penguins will come out running"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.