'विमानात काळा पैसा भरला, पांढरा करून आणला'; काँग्रेसचा अमित शहांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 06:58 PM2019-04-09T18:58:43+5:302019-04-09T18:59:08+5:30

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कपिल सिब्बल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

loksabha election 2019 congress claims ministers and businessmen money was carried by the plane during demonetisation | 'विमानात काळा पैसा भरला, पांढरा करून आणला'; काँग्रेसचा अमित शहांवर गंभीर आरोप

'विमानात काळा पैसा भरला, पांढरा करून आणला'; काँग्रेसचा अमित शहांवर गंभीर आरोप

Next

नवी दिल्ली- काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कपिल सिब्बल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. नोटाबंदीदरम्यान विमानाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला. त्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी कमिशनही घेतलं होतं, असा आरोपही सिब्बल यांनी केला आहे. व्हिडीओत सिब्बल म्हणतात, नोटाबंदीनंतर भाजपा नेत्यांनी 15 टक्क्यांपासून 40 टक्क्यांपर्यंत कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून दिल्या होत्या. 

सिब्बल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भाजपाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सिब्बल म्हणाले, नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बदलून देण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. ज्या टीमचं नेतृत्व भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केलं होतं. या टीममध्ये वेगवेगळ्या विभागातील अधिकारी होते. मंत्री आणि व्यावसायिकांचे पैसे विमानाच्या माध्यमातून हिंडन एअरबेसवर आणण्यात आले. तिकडून ते रिझर्व्ह बँकेत जमा केले गेले. त्या जुन्या नोटा 35 ते 40 टक्क्यांपर्यंत कमिशन घेऊन बदलण्यात आल्या होत्या. ते म्हणाले, नोटाबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. आपली यंत्रणा ही विरोधकांच्या हात धुऊन मागे लागली आहे.


ही दुःखद गोष्ट आहे. पण सत्ताधाऱ्यांच्या घरी कोणताही छापा पडत नाही. सिब्बल यांनी मध्य प्रदेशमध्ये पडलेल्या छाप्यांचाही हवाला दिला आहे. मोदी सरकारनं नोटाबंदी हा सर्वात मोठा घोटाळा केला असून, गेल्या पाच वर्षांत पाण्यासारखा पैसा वाया घालवला आहे. बँकर, सरकारी कर्मचारी आणि सरकारनं मिळून 15 ते 40 टक्क्यांपर्यंत कमिशन कमावले असल्यास यासारखा मोठा गुन्हा नाही. हा देशद्रोह आहे. यंत्रणा फक्त विरोधी पक्षांची चौकशी करत आहे. परंतु मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची कोणतीही चौकशी होत नाही. असं वाटतं ईडी, सीबीआय आणि एएनआय मोदी सरकारच्या ताब्यात आहेत. आता लोकशाही वाचवण्याचं काम जनतेचं आहे, असंही कपिल सिब्बल म्हणाले आहेत. 

Web Title: loksabha election 2019 congress claims ministers and businessmen money was carried by the plane during demonetisation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.