मागासांच्या पदोन्नतीबाबत ठाकरे-पवारांमध्ये चर्चा! कोरोना, मराठा आरक्षणसंबंधी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 07:37 AM2021-05-27T07:37:05+5:302021-05-27T09:38:07+5:30

Sharad Pawar-Uddhav Thackeray Meet: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तब्बल ४० मिनिटे चर्चा केली.

Discussion between Thackeray and Pawar regarding promotion of backward classes! Corona, Maratha Reservation Meeting | मागासांच्या पदोन्नतीबाबत ठाकरे-पवारांमध्ये चर्चा! कोरोना, मराठा आरक्षणसंबंधी बैठक

मागासांच्या पदोन्नतीबाबत ठाकरे-पवारांमध्ये चर्चा! कोरोना, मराठा आरक्षणसंबंधी बैठक

Next

मुंबई : कोरोनाची गंभीर परिस्थिती, मराठा आरक्षण, मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण असे मुद्दे ऐरणीवर असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तब्बल ४० मिनिटे चर्चा केली. दोघांमध्ये या विषयाबरोबरच तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत, राज्याची आर्थिक परिस्थिती, सीबीआय चौकशी यावरही चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

शरद पवार यांच्यावर मध्यंतरी एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते सार्वजनिक ठिकाणी गेलेले नाहीत. मध्यंतरी ते मुंबईत कारने फेरफटका मारत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियात टाकला होता. त्यानंतर मुख्यमंत्री बुधवारी पहिल्यांदाच पवार यांना ‘वर्षा’ बंगल्यावर भेटले. त्यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार कधी आणि काय भूमिका मांडणार, या बाबत उत्सुकता आहे. आरक्षणाबरोबरच मराठा समाजाला कुठल्या सवलती देता येऊ शकतील आणि एकूणच मराठा आरक्षणाबाबतची भूमिका याबाबत पवार-ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.  

लस उपलब्धतेवर सूचना 
- ठाकरे यांनी कोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती पवार यांना दिली. पवार यांनी त्यासंदर्भात तसेच लसींची उपलब्धता कशी होऊ शकेल, याबाबत काही सूचना केल्या. 
- तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदतीचे पॅकेज मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत मंजूर केले जाईल. त्यासंदर्भातही पवार यांनी काही सूचना केल्याची माहिती मिळते. 
- सीबीआयने अनिल देशमुख प्रकरणात चालविलेली चौकशी आणि त्याबाबतची सद्य:स्थिती यावरही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. 

तोडग्यासाठी सल्ला
मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण नाकारणारा ७ मे रोजीचा सध्या कळीचा मुद्दा ठरला असून, तो रद्द करावा, यासाठी काँग्रेस अत्यंत आक्रमक आहे. या जीआरसंदर्भात काय तोडगा काढवा, याबाबत पवार यांनी ठाकरेंना सल्ला दिल्याचे समजते.  

यामुळे संसर्गास आमंत्रण
पोस्ट कोविड रुग्णांमध्ये अ‍ॅस्परजिलोसिसदेखील वाढते आहे. रक्तातील साखर नियंत्रणासह १० दिवसांपेक्षा जास्त काळ स्टेरॉइडस्‌ घेणे टाळले पाहिजे, कारण ते बुरशीजन्य संसर्गास आमंत्रण देऊ शकते. स्टेरॉइडस्‌चा वापर केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असावा. जर मधुमेह असेल किंवा अवयव प्रत्यारोपण केले असेल, तर स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करणे टाळा.
- डॉ. रॉय पाटणकर
पोटविकारतज्ज्ञ- झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, संचालक

Web Title: Discussion between Thackeray and Pawar regarding promotion of backward classes! Corona, Maratha Reservation Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.