Devendra Fadanvis: किती काळ विरोधी पक्षात बसणार?; देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 05:12 PM2021-07-09T17:12:07+5:302021-07-09T17:14:31+5:30

Devendra Fadanvis News: राज्यातील ठाकरे सरकार स्थिर आहे. त्यामुळे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस हे अजून किती काळ विरोधी पक्षात बसणार हा सवाल विचारला जात आहे.

Devendra Fadanvis: How long will you stay in the Opposition ?; Devendra Fadnavis said We will sit in the opposition as long as we are allowed to sit in the opposition | Devendra Fadanvis: किती काळ विरोधी पक्षात बसणार?; देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले... 

Devendra Fadanvis: किती काळ विरोधी पक्षात बसणार?; देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले... 

Next

पुणे - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडींमुळे देवेंद्र फडणवीस यांना ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. तसेच त्यानंतर अजित पवार यांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णयही अंगलट आला होता. (Maharashtra Politics) तेव्हापासून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे दावे भाजपा नेत्यांकडून केले जातात. तसेच त्यासाठी वेगवेगळ्या तारखाही दिल्या जातात मात्र असे असूनही राज्यातील ठाकरे सरकार स्थिर आहे. त्यामुळे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस हे अजून किती काळ विरोधी पक्षात बसणार हा सवाल विचारला जात आहे. (How long will you stay in the Opposition ?; Devendra Fadnavis said We will sit in the opposition as long as we are allowed to sit in the opposition)

आज देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आले असताना प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांनी हसत हसत सूचक उत्तर दिले. अजून किती काळ विरोधी पक्षात बसणार? असे विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितका काळ विरोधी पक्षात बसायची आज्ञा असेल तितका काळ आम्ही विरोधी पक्षात बसू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


 
यावेळी प्रितम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे यांची नाराजी आणि भागवत कराड यांना मिळालेले मंत्रिपद याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आणि डॉ. भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांनी तयार केलेलं नेतृत्व आहे. याला पद दिल्याने, याला मंत्री केल्याने याला संपवायचंय वगैरे भाजपामध्ये नसतं. भागवत कराड यांना मंत्री केल्याने जेवढा आनंद मला किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांना झाला आहे. त्याच्यापेक्षा जास्त आनंद पंकजाताईंना झाला असेल. कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच यावेळी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्याची संधीही देवेंद्र फडणवीस यांनी सोडली नाही. संजय राऊत पंडित आहेत असं का वाटतं तुम्हाला?, असं विचारला असता, ते सर्वज्ञ आहेत असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं काही नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

Web Title: Devendra Fadanvis: How long will you stay in the Opposition ?; Devendra Fadnavis said We will sit in the opposition as long as we are allowed to sit in the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.