अहमदनगरमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी : काँग्रेसचे नगरसेवक विखेंच्या स्वागताला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 11:59 AM2019-03-15T11:59:32+5:302019-03-15T11:59:53+5:30

लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अहमदनगरमधील काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

Congress two group in Ahmadnagar: Congress corporator welcome to sujay vikhe-patil | अहमदनगरमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी : काँग्रेसचे नगरसेवक विखेंच्या स्वागताला

अहमदनगरमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी : काँग्रेसचे नगरसेवक विखेंच्या स्वागताला

googlenewsNext

अहमदनगर : लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अहमदनगरमधील काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. डॉ. विखे काल अहमदनगरमध्ये दाखल होताच ही दुफळी दिसून आली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे काल दुपारी अहमदनगर शहरात दाखल झाले. त्यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची भेट घेतली. यावेळी राठोड यांच्या पत्नी शशिकला यांनी त्यांचे औक्षण केले.

नगर शहरातील शिवसेनेचे सर्वच नगरसेवक उपस्थित होते. तसेच शहरातील काँग्रेसच्या माजी पदाधिका-यांनी व नगरसेवकांनी डॉ.विखे यांचे जल्लोषात स्वागत केले. स्वागतावेळ काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, धनंजय जाधव, मुद्दसर शेख यांच्यासह सचिन जाधव उपस्थित होते. बाळासाहेब पवार, निखिल वारे, धनंजय जाधव या तिघांच्याही पत्नी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. तर मुद्दसर शेख स्थायी समितीचे सभापती आहेत.

तर दुसरीकडे विखे भाजपात गेल्याने आघाडीचा प्रचार करण्यासाठी काही निवडक काँग्रेस नेत्यांची बैठक काल झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. वामशी चल्लारेड्डी, काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश चल्लारेड्डी यांनी दिले.

Web Title: Congress two group in Ahmadnagar: Congress corporator welcome to sujay vikhe-patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.