'संस्कृती बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:44 AM2019-04-19T05:44:45+5:302019-04-19T05:45:00+5:30

सध्या काँग्रेस आणि त्यांची महामिलावट आघाडी देशाला तोडणारा जाहीरनामा प्रसिद्ध करून मते मागत आहे,

Congress 'to defame culture' | 'संस्कृती बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव'

'संस्कृती बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव'

Next

निपाणी : सध्या काँग्रेस आणि त्यांची महामिलावट आघाडी देशाला तोडणारा जाहीरनामा प्रसिद्ध करून मते मागत आहे, पण देशभक्तीला मतदान करायचं की वंशपरंपरेला हे तुमच्या हातात आहे. भाजपने नेहमीच आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण काँग्रेसने मात्र आपल्या संस्कृतीलाच बदनाम करण्याचं काम चालवलं आहे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केला. चिक्कोडी येथील बी. के. महाविद्यालयाच्या समोरील मैदानात भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले व सुरेश अंगडी यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते.
कर्नाटकात सत्तेत असलेल्या काँग्रेस-निजद सरकारने केलेली कर्जमाफी अद्याप संपूर्ण शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मग या कर्जमाफीचं काय झालं? केंद्र सरकारने सुरू केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभही कर्नाटकातील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने मिळालेला नाही, याला कारणीभूत कर्नाटकातील काँग्रेस-निजद सरकारच आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आपले सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकरी सन्मान योजनेचा लाभ सर्व शेतकºयांना देणार आहे. एवढेच नव्हे तर वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या शेतमजुरांना पेन्शन व पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येतील. मुलांना शिक्षण, युवकांना नोकरी, वृद्धांना औषधे, शेतकºयांना सिंचन व प्रत्येकाला महागाईपासून मुक्ती अशी विकासाची पंचसूत्री राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
>साखरेचा दर ठरविणार
शेतकºयांना अधिकचे उत्पन्न मिळावे यासाठी उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार आहे. तसेच साखरेचे मूल्यांकन करून दर निश्चित करण्यात येईल, असेही मोदी यांनी सांगितले.

Web Title: Congress 'to defame culture'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.