'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपाने गमावली'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:15 PM2021-08-11T17:15:51+5:302021-08-11T17:15:59+5:30

Maratha Reservation: 'भाजपाकडे मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची संधी होती.'

'BJP misses big opportunity to get reservation for Maratha community', says ashok chavan | 'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपाने गमावली'

'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपाने गमावली'

Next

मुंबई: मराठ आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 'भाजपाकडेमराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची संधी होती. परंतु याकडे दुर्लक्ष करून ही संधी भाजपने गमावली, अशा शब्दांत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

याबाबत अधिक बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यांच्या अधिकारांबाबत घटना दुरुस्ती करताना 50 टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची मोठी संधी केंद्र सरकारकडे होती. पण, केंद्राने ही संधी गमावली आहे. याबाबीचा घटनादुरुस्ती करताना समावेश झाला असता तर याचा नक्कीच फायदा झाला असता आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर झाला असता. याकडे केंद्राने दुर्लक्ष केलं, दुर्दैवी बाब म्हणजे याबाबत एकाही भाजपच्या खासदाराने आवाज उठवला नाही. आज त्यांना याबाबत बोलण्याची संधी होती परंतु ती संधी देखील खासदारांनी गमावली आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
  
भाजपाचं मराठा समाजावरील प्रेम पुतना मावशीचं
मोदी सरकारने काल लोकसभेमध्ये मांडलेल्या 127 व्या घटना दुरुस्ती विधेयकाला अस्पष्ट आणि शंका निर्माण करणारे असल्याची टीका आता शिवसेनेने केली आहे. आरक्षणासाठी राज्यांना मिळणारे अधिकार फुलप्रुफ असावेत. तसेच आरक्षणासाठीची 5 टक्क्यांची मर्यादा काढून राज्यांना आरक्षण वाढवण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे.

याबाबत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनायक राऊत म्हणाले की, केंद्र सरकारने मांडलेले हे विधेयक अस्पष्ट आहे. आरक्षणाबाबत असलेली 50 टक्क्यांची कॅप काढून टाकल्याशिवाय राज्यांना या कायद्याचा फायदा होणार नाही उलट वाद निर्माण होतील. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याने आम्ही आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्याची दुरुस्ती आम्ही सुचवली होती. ही दुरुस्ती मतदानास टाकली असता काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. मात्र भाजपा आणि अन्य मित्रपक्षांनी विरोध केला. त्यामुळे ही दुरुस्ती फेटाळली गेली. आरक्षणामध्ये महत्त्वाचा अडथळा असलेली 50 टक्क्यांची मर्यादा काढण्याबाबत सुचवलेल्या दुरुस्तीला भाजपाने विरोध केल्याने भाजपाचं बिंग काल लोकसभेमध्ये फुटले आहे. भाजपाचं मराठा समाजावर असलेलं प्रेम पुतना मावशीचं आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला नैतिक अधिकार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
 

Web Title: 'BJP misses big opportunity to get reservation for Maratha community', says ashok chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.