१७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मात्र राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 06:39 AM2019-04-17T06:39:50+5:302019-04-17T06:40:10+5:30

निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही.

174 farmers suicides; But the neglect of political leaders | १७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मात्र राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

१७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मात्र राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

Next

औरंगाबाद/नाशिक/नागपूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात असली, तरी नापिकी व कर्जाच्या बोजामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकलेला नाही. निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राज्यातील तब्बल १७४ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली असून, प्रचाराच्या गलबल्यात त्याकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ मिळालेला नाही.
सर्व राजकीय पक्षांचे पुढारी लोकांकडे मतांचा जोगवा मागत फिरत असताना, नापिकी, शेतमालाला मातीमोल भाव, कर्जबाजारीपणातून होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे मात्र कोणालाच देणेघेणे नसल्याची स्थिती आहे. दुष्काळाचे भीषण चटके सोसाव्या लागणाºया मराठवाड्यात ९१ शेतकºयांनी महिनाभरात मृत्यूला कवटाळले. त्यानंतर, विदर्भात ४९ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. खान्देशात १५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. बागायती पट्टा म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिकमध्येही ९ शेतकºयांनी जीवन संपविले. मराठवाड्यात १ जानेवारी ते १४ एप्रिलपर्यंत २२० शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. १४८ शेतकºयांना सरकारी मदत मिळाली असून, ५४ प्रकरणे अपात्र आहेत, तर १८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. १ ते ३१ मार्चपर्यंत ६९ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, मागील पंधरवड्यात सुमारे २२ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.
राज्य सरकारने अटी-निकषात शेतकºयांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले, तर केंद्र सरकारनेही चालू वर्षापासून शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. तरीही शेतकºयांना दिलासा मिळालेला नाही. यंदा दुष्काळामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम वºहाडात अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांत महिनाभरात १६ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. जानेवारीपासून अहमदनगर जिल्ह्यातील ४० शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत.
>शेतकºयांचा विसर
राजकारण्यांची ९८ टक्के भाषणे एकमेकांवर आरोप करणारी आहेत. या रणधुमाळीत शेतकºयांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. शेतकºयांची आत्महत्या, त्यांच्या आर्थिक प्रश्नांना बगल दिली जात आहे.
- किशोर तिवारी,
अध्यक्ष, वसंतराव नाईक
शेती स्वावलंबन मिशन
>रोजच पुलवामा
राज्यात दिवसाकाठी ४३ शेतकरी आत्महत्या करीत असल्यामुळे येथे रोजच पुलवामा होतो आहे. काँग्रेसने शेतकरीविरोधात केलेले कायदे भाजपने रद्द केले नाहीत. ते दोन्ही पक्ष शेतकरी आत्महत्यांना जबाबदार आहेत. शेतकºयांचे मारेकरी हेच पक्ष आहेत, म्हणून ते तोंड लपवीत आहेत. - अमर हबीब,
शेतकरी पुत्र आंदोलन

Web Title: 174 farmers suicides; But the neglect of political leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.