पूर्ववैमनस्यातून चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:59 PM2018-05-30T12:59:59+5:302018-05-30T12:59:59+5:30

चाफेकर चौकाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कोयता आणि लोखंडी रॉडने शरीरावर वार करत हा खून करण्यात आला.

youth's murder from past quarrel case at Chinchwad | पूर्ववैमनस्यातून चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून 

पूर्ववैमनस्यातून चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून 

Next
ठळक मुद्देउपचार सुरु असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना चाफेकर चौकात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आकाश उर्फ रायबा तानाजी लांडगे (वय २४, रा. पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत ज्ञानोबा वीर (वय ४४, रा. लक्ष्मीगंधा अपार्टमेंट, पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रणजित बाबू चव्हाण (वय २७, वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे (वय २३, रा भोई आळी, चाफेकर  चौकाजवळ, चिंचवडगाव), प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश आणि रणजित यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून भांडणे सुरु होती. मंगळवारी रात्री आकाश दुचाकीवरून जात होता. चाफेकर चौकाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याला अडविले. कोयता आणि लोखंडी रॉडने आकाशच्या पायावर आणि कमरेच्या खाली मागील बाजूला वार केले. तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. 
आरोपी रणजित चव्हाण याच्यावर यापुर्वी ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. मृत्यू झालेल्या आकाश याच्यावरही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. घटनेचा पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहे. 

Web Title: youth's murder from past quarrel case at Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.