पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 14:05 IST2018-02-12T14:04:19+5:302018-02-12T14:05:38+5:30
पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आली.

पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाची आत्महत्या
पिंपरी : पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. श्रावण गोरख कुसाळकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण कुसाळकर (वय २६, रा. राहुल नगर, ओटा स्कीम, निगडी) याचे पत्नी नीता हिच्याबरोबत रविवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले होते. श्रावण दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेत त्याने पत्नी नीताला मारहाण, शिवीगाळ केली. हे भांडण ऐकून खालच्या मजल्यावर राहणारी नीताची बहीण वर आली आणि ती नीताला तिच्या घरी घेऊन गेली. भांडणाचा राग मनात धरून श्रावणने त्याच रात्री पहाटेच्या सुमारास पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावण आणि नीताचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.