पवना धरणातून सोडलेलं पाणी नेमकं जातंय तरी कुठं...? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 02:23 PM2018-10-20T14:23:24+5:302018-10-20T14:27:54+5:30

गेल्या आठवडाभरापासून शहरात कमालीची पाणी टंचाई आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरत आहेत. पवना धरण भरलेले आहे. तसेच पाणीही नदीत वेळेवर सोडले जाते. मग पाणी जातेय कोठे?...

Where is the water released from Pawna dam ? | पवना धरणातून सोडलेलं पाणी नेमकं जातंय तरी कुठं...? 

पवना धरणातून सोडलेलं पाणी नेमकं जातंय तरी कुठं...? 

Next
ठळक मुद्देपाणी उचलणे आणि वितरण करणे ही व्यवस्था कोलमडलेली आमदार, खासदारांनी सज्जड दम देऊनही पाणी समस्या तशीचकृत्रिम पाणी टंचाईस कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी.लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनाही अधिकारी चुकीची माहिती देऊन दिशाभूल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे पाणी टंचाई जाणवत आहेत. पवना धरणातून पुरेसा पाणी पुरवठा होत असताना महापालिकेचे अधिकारी पाणी पुरेसे नाही असे सांगत आहेत. पवना धरणातून सोडलेले पाणी मुरतेय कोठे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण, पवनानदी, रावेत येथील जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. पाणी उचलणे आणि वितरण करणे ही व्यवस्था कोलमडली आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरात कमालीची पाणी टंचाई आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरत आहेत. आमदार, खासदारांनी सज्जड दम देऊनही पाणी समस्या तशीच आहे. पवना धरण भरलेले आहे. तसेच पाणीही नदीत वेळेवर सोडले जाते. मग पाणी जातेय कोठे? हे विचारण्यासाठी महापौर राहूल जाधव यांनी बैेठक घेतली होती. शुक्रवारपर्यंत मुदत दिली होती. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाला दिलेली मुदत संपली तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. 
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि जलसंपदा, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यातील पाणी पुरवठ्याच्या आकडेवारीत तफावत आहे. लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनाही अधिकारी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. त्यांना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पाठीशी घालत आहेत. तसेच पाणी समस्येस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती आणि पदोन्नतीची बक्षिसी दिली जात आहे.
शिवसेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले, धरणातून पाणीपुरवठा होत आहे. मग गळती कोठे आहे. पाणी वितरण स्तरावर गळती आहे. प्रशासनातच गळती आहे. ही गळती शोधण्याची गरज आहे. कृत्रिम पाणी टंचाईस कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी. नागरिकांना वेठीस धरणाऱ्या  अधिकारी आणि प्रशासनास वठणीवर आणण्याची गरज आहे. आयुक्तांनी आपली कार्यक्षमता दाखवावी. 

दिनांक,                           महापालिका अधिकाऱ्यांची माहिती,          पाटबंधारे विभागाची माहिती (पाणीपुरवठा एमएलडीत)
११ आॅक्टोबर                            ४८४                                                           ७३४
१२ आॅक्टोबर                             ४७३                                                             ७३४
१३ आॅक्टोबर                            ४७२                                                             ७८३
१४ आॅक्टोबर                            ४६१                                                             ८५६
१५ आॅक्टोबर                            ४५४                                                             १०६०
१६ आॅक्टोबर                           ४७०                                                             ८५७
१७ आॅक्टोबर                           ४५७                                                              ८५७
१८ आॅक्टोबर                          ४६७                                                             ८२६
.
 

Web Title: Where is the water released from Pawna dam ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.