‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचा घाट, महापालिका प्रशासनाचे गौडबंगाल : काळ्या यादीतील ठेकेदाराला काम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:17 AM2017-10-17T03:17:33+5:302017-10-17T03:17:43+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या गंभीर प्रश्नाचे पडसाद उमटले. भाजपाच्या नगरसेवकांनीही कचराप्रश्नी सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. कचरा प्रश्न सुटला नाही, तर प्रभाग कार्यालय, तसेच आयुक्त कार्यालयात कचरा टाकण्यात येईल

 'West to Energy' project, Ghagbangal municipal administration: black list contractor | ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचा घाट, महापालिका प्रशासनाचे गौडबंगाल : काळ्या यादीतील ठेकेदाराला काम  

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचा घाट, महापालिका प्रशासनाचे गौडबंगाल : काळ्या यादीतील ठेकेदाराला काम  

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या गंभीर प्रश्नाचे पडसाद उमटले. भाजपाच्या नगरसेवकांनीही कचराप्रश्नी सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. कचरा प्रश्न सुटला नाही, तर प्रभाग कार्यालय, तसेच आयुक्त कार्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षातील नगरसेवकांनी दिला.
प्रशासनामुळेच कचरा व्यवस्थापन विस्कटले आहे, असा आरोप करीत सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रशासनास धारेवर धरले. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात काळ्या यादातील ठेकेदाराला काम देण्याचा घाट घातला जात आहे. यातील गौडबंगाल काय, असा प्रश्नही नगरसेवकांनी उपस्थित केला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. सहा महिन्यांपासून शहरभरातील कचरा नियोजन विस्कटले आहे. त्याचे पडसाद सभेत उमटले. मागील महिन्यातील तहकूब सभेचे कामकाज दुपारी एकला सुरू झाले. त्या वेळी पहिला आणि दुसरा विषय तहकूब करण्यात आला. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या निधीचा विषय चर्चेला आल्यानंतर आरोग्याच्या समस्येवर सत्ताधारी आणि विरोधकांनी फटाके फोडले. या विषयी चर्चेस सुरुवातीला भाजपाचे नगरसेवक राहुल जाधव यांनी कचरा प्रश्न गंभीर झाल्याचे सांगितले. मीनल यादव यांनी घरोघरचा कचरा उचलला जात नाही. तक्रारी करूनही प्रशासन दाद देत नाही. टाळाटाळ करते, असा आरोप केला. अभिषेक बारणे यांनी अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाही, याविषयी नाराजी व्यक्त केली.
आंदोलक नगरसेवकांवर गुन्हा
‘स्वच्छ भारत अभियान’ हे केवळ फोटोसाठी झाले आहे. महापालिकेत कचरा टाकून निषेध आंदोलन केले, तर नगरसेवकांवर गुन्हा दाखल होतो. मग आम्ही दाद कोणाकडे मागायची, असे दत्ता साने म्हणाले. मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, कचरा प्रश्न सुटला नाही, तर आयुक्त कार्यालय, प्रभाग कार्यालयात कचरा टाकला जाईल, करा किती गुन्हे दाखल करायचे ते.’’
कच-याचे गौडबंगाल काय ?
शिवसेनेचे नगरसेवक नीलेश बारणे म्हणाले, ‘‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे काम राजकोटमध्ये काळ्या यादीतील ठेकेदारास दिले आहे. कचºयाचे गौडबंगाल काय याचा शोध घ्यायला हवा.’’ शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘सत्ता येऊन सहा महिने झाले, तरी कचरा प्रश्न सुटलेला नाही. असे का होते याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.’’


सीमा सावळे : ठेकेदार कोणाचे हे तपासा
कच-याची समस्या आहे, हे वास्तव यापूर्वीच्या कचराविषयक ६७ संस्थांनी कर्मचाºयांचे ईएसआय आणि पीएफचे पैसे भरलेले नव्हते. त्यामुळे कष्टक-यांची पिळवणूक होत होती. त्यामुळे नवीन प्रक्रिया करताना अटी आणि शर्तीत बदल केला आहे. गोरगरिबांच्या अधिकारांना संरक्षण मिळायला हवे. महापालिकेसमोर कचरा टाकल्यानंतर उचलला नाही, म्हणून संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. स्वच्छ भारत अभियान फोटो सेशनसाठी नव्हते. त्या दिवशी आम्ही पाच किलोमीटरचा कचरा उचलला होता, असे सीमा सावळे यांनी सांगितले.

नियोजनशून्य कारभाराचा फटका : योगेश बहल
मंगला कदम म्हणाल्या, ‘‘भाजपाच्या नगरसेवकांनी कचराप्रश्नी घरचा आहेर दिला आहे. गेल्या पंधरा वर्षांत कधी कचºयाची समस्या नव्हती. आता निर्माण झाली आहे. त्यात राजकारण करू नये.’’ विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘आरोग्यबाबत मनमानी सुरू आहे. नियोजनशून्य कारभार सुरू आहे. प्रभाग चुकीच्या पद्धतीने फोडल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. सल्लागार जगविण्याचे काम सुरू आहे.’’ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘कचरा समस्येवरून दिवाळीचे फटाके उडाले आहेत. आम्ही काय काम करतो. यासाठी अजित पवारांच्या सर्टिफिकेटची गरज नाही.’’

Web Title:  'West to Energy' project, Ghagbangal municipal administration: black list contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.