पिंपरी, थेरगावात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड; टवाळखोर मद्यपी असल्याचा पोलिसांना संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:18 PM2018-01-08T13:18:49+5:302018-01-08T13:31:32+5:30

थेरगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यात उभ्या केलेल्या पाच वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला.

vehicle sabotage in thergaon, Pimpari chinchwad; police doubt on drunken alcoholic people | पिंपरी, थेरगावात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड; टवाळखोर मद्यपी असल्याचा पोलिसांना संशय

पिंपरी, थेरगावात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड; टवाळखोर मद्यपी असल्याचा पोलिसांना संशय

Next
ठळक मुद्दे दोन मोटारी व तीन मालवाहतूक टेम्पोची करण्यात आली तोडफोडतक्रार देण्यासाठी कोणीही आले नाही, तरी आम्ही गुन्हा दाखल करणार : श्रीधर जाधव

वाकड : थेरगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यात उभ्या केलेल्या पाच वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला.
चिंचवड डांगे चौक रस्त्यावरील मोरेश्वर कॉलनी व वनदेव आनंदवन सोसायटी रस्त्यावरील आनंद मेमोरियल हॉस्पिटल समोर उभ्या केलेल्या दोन मोटारी व तीन मालवाहतूक टेम्पोची तोडफोड करण्यात आली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मात्र याबाबत अद्याप फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात कोणीही फिरकले नाही. काही टवाळखोर मद्यपी तरुणांचे हे कारस्थान आहे. त्यांच्या मागावर आम्ही आहोत. तक्रार देण्यासाठी कोणीही आले नाही, तरी आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत असे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी सांगितले.


तर पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरातही टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (ता. ८) पहाटे उघडकीस आली आहे.
येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसणाऱ्या टोळक्याने ही तोडफोड केली. १५ दिवसापूर्वी याठिकाणी वाळलेल्या गवताला कोणीतरी आग लावली होती. तसेच या आधी ही या परिसरात गाड्या फोडण्याच्या घटना झालेल्या आहेत त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे.

Web Title: vehicle sabotage in thergaon, Pimpari chinchwad; police doubt on drunken alcoholic people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.