शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी तीनच निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:47 AM2017-09-25T04:47:33+5:302017-09-25T04:47:36+5:30

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाअंतर्ग प्रस्तावित असलेल्या दोन मार्गिकांपैकी शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावरील मेट्रोसाठी अवघ्या तीनच

Three tender for Shivajinagar-Hinjewadi Metro | शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी तीनच निविदा

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी तीनच निविदा

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाअंतर्ग प्रस्तावित असलेल्या दोन मार्गिकांपैकी शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावरील मेट्रोसाठी अवघ्या तीनच कंपन्यांनी निविदा भरल्या असून पूर्वपात्रता फेरीत त्या निविदा पात्र ठरल्या आहेत.
तब्बल ८ हजार ६०० रुपयांच्या शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावरच्या २३.३ किलोमीटरच्या उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनांकडून तीन हजार कोटींचा निधी मिळणार आहे. उर्वरित निधी उभा करण्याचे मोठे आव्हान पीएमआरडीएसमोर आहे. या प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या जागतिक निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे १० मे आणि २५ मे अशी दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने २२ जूनपर्यंत तिसरी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आयआरबी, आयएलएफएस आणि बोलीपूर्व (प्री-बिड) टाटा रिएल्टी-सीमेन्स या कंपन्या पुढे आल्यानंतर त्यांनी निविदा पूर्वपात्रता फेरी पूर्ण केली आहे. आणखी कंपन्या पुढे येण्याची वाट पाहण्यात येत आहे.

1आणखी कंपन्या आल्यास बोली लावून एका कंपनीची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या कंपनीकडून आॅक्टोबरमध्ये निविदा भरली जाईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये कराराला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. प्राधिकरणाने नेमलेल्या व्यवहार सल्लागाराची मदत घेऊन तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. हा करार ३५ वर्षांसाठी करण्यात येणार असल्याचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले. हा प्रकल्प खासगी सहभागातून राबविण्यात येईल. कंपनीला स्थावर मालमत्ता भाड्याने, व्यावसायिक वापराकरिता देण्यात येणार आहेत.
2या जागांवर जादा चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येणार आहे. यामधून कमी पडणारा निधी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने २० टक्के निधीला मान्यता दिली असून कंपनीला प्रकल्पासाठी भूसंपादन करून देण्यात येणार आहे. एकूण जागेपैकी १५ टक्के जागा वाहनतळ, मेट्रो स्थानकासाठी संपादित करण्यात येणार असून मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात येतील.

Web Title: Three tender for Shivajinagar-Hinjewadi Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.