तरुणाला दगडाने मारहाण, बारा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 09:17 PM2018-02-04T21:17:27+5:302018-02-04T21:17:30+5:30

यात्रेला गेलेल्या युवकाच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान करून तरुणाला व त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर आज दि. ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला

Threats to the young man | तरुणाला दगडाने मारहाण, बारा जणांवर गुन्हा दाखल

तरुणाला दगडाने मारहाण, बारा जणांवर गुन्हा दाखल

Next

चाकण : कडाच्यावाडीत यात्रेला गेलेल्या युवकाच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान करून तरुणाला व त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर आज दि. ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अरुण लांडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना शनिवारी दि ३ रोजी रात्री ९ च्या सुमारास कडाचीवाडी येथील संदीप ठाकर यांच्या शेतात घडली. याबाबतची फिर्याद महादेव श्रीरंग गायकवाड ( वय २४, रा. कुंभारवाडा, पवनेश्वर मंदिराजवळ, पिंपरीगाव, पुणे ) यांनी दिली. याप्रकरणी गणेश भालेराव, खांडेभराड ( पूर्ण नाव नाही ) व त्यांचे ८ ते १० साथीदार यांच्यावर भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, १४३, १४७, १४८ व १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, शनिवारी रात्री ९ वाजता फिर्यादी गायकवाड हे मित्र संदीप ठाकर यांचेकडे यात्रेसाठी आले असता त्यांच्या शेतात गप्पा मारत बसले असता, अचानक पाठीमागून आलेल्या आरोपींनी फिर्यादीने आणलेली मोटार क्रमांक एम एच १४ एफ जी ००१७ च्या मागील काचेवर दगड मारून नुकसान केले. फिर्यादी दगड का मारला हे विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही दगडाने मारून जखमी केले. तसेच गजानन ठाकर व विष्णू ठाकर हे त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शेख हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Threats to the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.