अचानक झालेल्या पावसाने धांदल, उकाड्यापासून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:56 AM2018-09-28T00:56:58+5:302018-09-28T00:57:30+5:30

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. यामुळे चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना काहिसा दिलासा मिळाला. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली.

Sudden rain , relief from cracks | अचानक झालेल्या पावसाने धांदल, उकाड्यापासून दिलासा

अचानक झालेल्या पावसाने धांदल, उकाड्यापासून दिलासा

Next

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. यामुळे चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना काहिसा दिलासा मिळाला. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली.
मागील महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर विश्रांती घेतलेला पाऊस ऐन गणेशोत्सवात पुन्हा जोरदार बरसला. मात्र, त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून दुपारच्यावेळी कडाक्याचे ऊन जाणवत होते. या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.
दरम्यान, गुरुवारीही सकाळी अकरापासूनच उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. यामुळे सहाच्या सुमारासच अंधार पडला होता.
तसेच पावसालाही सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. नोकरदारवर्गाची धावपळ झाली. कडाक्याच्या उन्हानंतर पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुपारच्या वेळी कडाक्याचे ऊन व रात्रीच्या वेळी हवेतील गारवा, तसेच आता पावसानेही हजेरी लावली. अशाप्रकारच्या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, शहरात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
काही दिवसांपासून ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. मात्र गुरुवारी झालेल्या पावासामुळे वातावरणात काही प्रमाणात थंडावा निर्माण झाला आहे.

चिंचवडमध्ये जोरदार पाऊस />चिंचवड : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज चिंचवड परिसरात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळपासून उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजता जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. सखल भागात पाणी शिरले. रस्त्यांवर वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. गुरुवारी सकाळपासून वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी काळेकुट्ट ढग दाटून आले. पाच वाजता पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढत गेला. रस्त्यावरील व्यावसायिकांची धावपळ झाली. पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांचेहाल झाले. रस्त्यावर पाणी साठल्याने काही भागात वाहतूक ठप्प झाली. चिंचवड स्टेशन, दळवीनगर उड्डाणपूल, चापेकर चौक, जुना जकात नाका, तानाजीनगर, सुदर्शननगर भागातील रस्त्यावर पाणी साठले होते. झोपडपट्टीतील सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांचे हाल झाले. पावसाचा जोर ओसरल्यानंतर नागरिक छत्री व रेनकोट घेऊन घराबाहेर पडत होते. पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझीम सुरू होती.
रहाटणी, पिंपळे सौदागरलाही हजेरी
रहाटणी : गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात
मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. ऊन व ढगांचा लपंडाव दिवसभर सुरू होता. मात्र सायंकाळी
अचानक वाºयासह पाऊस आल्याने सर्वांचीच
धावपळ उडाली. रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड, सांगवी, पिंपळे निलख परिसरात वादळासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे व्यावसायिकांची धांदल उडाली. अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी वाºयामुळे पत्राशेड टपºयांची पडझड झाली. एमआयडीसीला गुरुवारी साप्ताहिक सुटी असल्याने कामगारवर्ग खरेदीसाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत होता. काहीजण
बाजारात खरेदीसाठी दाखल झाले होते.
परिसरातील भाजी मंडई, हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले यांनी आपली दुकाने थाटली होती. सायंकाळी वाºयासह पावसाने हजेरी लावल्याने
सर्वांची धावपळ उडाली. सुमारे अर्धातास जोरदार पाऊस सुरू होता. अचानक झालेल्या
पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला.
 

Web Title: Sudden rain , relief from cracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.