Pune Crime| आत्याच्या नवऱ्याने केला महिलेचा विनयभंग; ५० वर्षीय आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:26 AM2022-08-10T10:26:27+5:302022-08-10T10:30:02+5:30

पीडितेला प्रपोज करून गैरकृत्य....

relative molested the woman 50-year-old accused arrested pune crime news | Pune Crime| आत्याच्या नवऱ्याने केला महिलेचा विनयभंग; ५० वर्षीय आरोपीला अटक

Pune Crime| आत्याच्या नवऱ्याने केला महिलेचा विनयभंग; ५० वर्षीय आरोपीला अटक

Next

पिंपरी : आत्याच्या घरी राहण्यासाठी आलेल्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आत्याच्या नवऱ्याने विनयभंग केला. हा प्रकार २५ जानेवारी ते ७ जून २०२२ या कालवधीत घडला. या प्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि.८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी ५० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही आत्याच्या घरी राहण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने २५ जानेवारी ते ७ जून या कालावधीत फिर्यादीला प्रपोज करून फिर्यादीच्या मनात लज्ज उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

तसेच फिर्यादिला चारचाकी गाडी शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत लगट करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: relative molested the woman 50-year-old accused arrested pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.