सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड पाचवे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 08:56 PM2017-09-29T20:56:22+5:302017-09-29T20:56:43+5:30

स्मार्ट सिटी आणि स्वच्छता भारत अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बिरुदावलीत आणखी एक भर पडली आहे. प्रॉपर्टी कन्सलटंट असलेल्या एका खासगी संस्थेने देशातील जगण्यासाठी सुयोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे.

 Pimpri-Chinchwad fifth in the list of suitable cities | सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड पाचवे

सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड पाचवे

पिंपरी  -  स्मार्ट सिटी आणि स्वच्छता भारत अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बिरुदावलीत आणखी एक भर पडली आहे. प्रॉपर्टी कन्सलटंट असलेल्या एका खासगी संस्थेने देशातील जगण्यासाठी सुयोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवा क्रमांक आला आहे.

देशातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. गेल्या ३० वर्षांत येथील लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्येमुळे देशातील अनेक शहरे भकास झाली आहेत. हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र, काही शहरांचे नियोजन अतिशय योग्यरित्या झाल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेने देशातील सुनियोजित अशा शहरांची एक स्पर्धा घेतली होती. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवा क्रमांक आला आहे. जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या या स्पर्धेत १० निकष ठेवले होते. त्यात नियोजन, दळणवळण सुविधा, मूलभूत सुविधांचे प्रमाण, दैनंदिन गरजा, विश्रांती व मनोरंजन, स्मार्ट प्रशासन, सुरक्षितता व निर्भयता, नोकरीच्या संधी, पर्यावरण व शाश्वत विकास, बांधकाम क्षेत्राची कामगिरी, भविष्याचा विस्तार, दृष्टिकोन हे निकष ठेवण्यात आले होते.

अशीही आहेत, सुयोग्य शहरे

या निकषांत पहिल्या पाचमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक लागला आहे. त्यात पालवा, नवी मुंबई, मोहाली पंजाब, महिंद्रा सिटी चेन्नई, पिंपरी-चिंचवड, राजरहट कोलकाता, टेक्नोपार्क त्रिवेंद्रम, मगरपट्टा सिटी पुणे, ग्रेटर नोयडा या शहरांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यपिंपरी-चिंचवड हे शहर अत्यंत वेगाने विकसित झालेले शहर आहे. आता या शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही राज्यात पहिला आणि देशात नववा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर सुयोग्य शहराच्या यादीत शहरास पाचवा क्रमांक मिळाला आहे, ही भूषणावह बाब आहे. आपले शहर रहिवाशांसाठी सर्वोत्तम शहर आहे, यावर मोहोर उमटविली आहे.ह्णह्ण

Web Title:  Pimpri-Chinchwad fifth in the list of suitable cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार