पिंपरी : शाळांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, महापालिकेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:23 AM2018-02-26T05:23:01+5:302018-02-26T05:23:01+5:30

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व्यावसायिक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महापालिका आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी ९ माध्यमिक शाळांमध्ये व्हेंडिंग मशिन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेशन मशिन बसविण्यात आले.

Pimpri: Allocation of sanitary napkins to the schools, municipal activities | पिंपरी : शाळांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, महापालिकेचा उपक्रम

पिंपरी : शाळांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, महापालिकेचा उपक्रम

Next

पिंपरी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व्यावसायिक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महापालिका आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी ९ माध्यमिक शाळांमध्ये व्हेंडिंग मशिन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेशन मशिन बसविण्यात आले.
महापालिकेच्या वतीने यापूर्वी आकुर्डी, काळभोरनगर, रुपीनगर, श्रमिकनगर, निगडी येथील माध्यमिक शाळेमध्ये हे मशिन बसविण्यात आले आहे. पिंपळे गुरव, थेरगाव, क्रीडा प्रबोधिनी, केशवनगर व पिंपळे सौदागर येथे या वर्षात कंपनीच्या वतीने सीएसआर अंतर्गत सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व इन्सिनरेशन मशिन बसविले आहे.
एक्साईड इंडस्ट्रीज लि. यांनी पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयामध्ये बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व इन्सिनरेशन मशिनचे महानगरपालिकेस प्रातिनिधिक स्वरूपात हस्तांतरण आज करण्यात आले. व्हेंडिंग मशिनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकल्यानंतर एक सॅनिटरी नॅपकीन मिळते. तसेच वापर केलेले सॅनिटरी नॅपकीन इन्सिनरेशन मशिनमध्ये टाकल्यानंतर साधारण १५ मिनिटांमध्ये शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट होऊन त्याची राख ट्रेमध्ये राहते. तसेच मशिनला असून धूर जाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आले आहे, असे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसदस्या उषा मुंढे, चंदा लोखंडे, नगरसदस्य सागर आंघोळकर, तसेच एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मुख्य अधिकारी के. अनिरुद्ध, एस. श्रीधरन, डेप्युटी मॅनेजर निमा गिध, तसेच सह आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी श्रीमती स्मिता झगडे, मुख्याध्यापक वडगणे एस.डी, सहायक आरोग्याधिकारी व्ही. के. बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव व आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई उपस्थित होते.
मशिनसाठी सव्वातीन लाख रुपये खर्च आला असून, सीएसआर तत्त्वावर प्रायोजक कंपनीमार्फत करण्यात आला आहे. सदरच्या मशिनचा वापर माध्यमिक विद्यार्थिनींना होणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांसाठी सीएसआर अंतर्गत उद्योजक, व्यापारी, कॉर्पोरेट कंपनी, सेवाभावी संस्था यांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे.
- दिलीप गावडे

Web Title: Pimpri: Allocation of sanitary napkins to the schools, municipal activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.