शिक्षण जास्त असल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, सासरच्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:29 PM2022-03-10T12:29:25+5:302022-03-10T12:32:08+5:30

टोमणे मारून फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण..

physical and mental harassment of married women due to high education | शिक्षण जास्त असल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, सासरच्यांवर गुन्हा दाखल

शिक्षण जास्त असल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, सासरच्यांवर गुन्हा दाखल

Next

पिंपरी : विवाहितेचे शिक्षण जास्त तसेच फिर्यादीस मुली झाल्या या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २५ एप्रिल २०१६ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत शनिवार पेठ, कराड, जि. सातारा येथे घडला. 

कल्पेश धिरजलाल शहा (वय ४४), कोकीला धिरजलाल शहा (वय ७५), योगेश धिरजलाल शहा (वय ४६), प्रेरणा शहा (वय ४३), कुमुदिनी कोठारी (वय ४८) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विवाहित महिलेने या प्रकरणी बुधवारी (दि. ९) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे शिक्षण जास्त, फिर्यादीस मुली झाल्या या कारणावरून टोमणे मारून फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच शारीरिक व मानसिक छळ करून फिर्यादीला बघून घेण्याची धमकी दिली. फिर्यादी व फिर्यादीच्या मुलींच्या खर्चासाठी पैसे न देता व फिर्यादीला सासरी नांदण्यास नकार देत फिर्यादीचा छळ केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: physical and mental harassment of married women due to high education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.