शिवनेरीहून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाताना झालेल्या अपघातात एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 06:08 PM2018-04-17T18:08:55+5:302018-04-17T18:08:55+5:30

शिवनेरी किल्ल्यातून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील युवक जागीच ठार झाला असून अन्य दोन युवक जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रमोद भोसले यांनी दिली.

One person was killed in accident | शिवनेरीहून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाताना झालेल्या अपघातात एक जण ठार

शिवनेरीहून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाताना झालेल्या अपघातात एक जण ठार

Next

चाकण  - शिवनेरी किल्ल्यातून साताऱ्याकडे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील युवक जागीच ठार झाला असून अन्य दोन युवक जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार प्रमोद भोसले यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज ( दि. १७ ) रात्री सव्वाबाराच्या सुमारास पुणे-नासिक महामार्गावर वाकी खुर्द ( ता.खेड ) गावच्या हद्दीत काळोबा मंदिराजवळ झाला. सातारा जिल्ह्यातील हे युवक सोमवारी टेम्पो व दुचाकीवरून शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरीला गेले होते. शिवनेरीहुन परतताना रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघातात स्वप्नील अरविंद चव्हाण ( वय २४,रा पाचपुतेवाडी, ता.वाई, जि. सातारा ) हा युवक मयत झाला. तर अमर चंद्रकांत पाचपुते (वय २४), विनायक रामचंद्र गोळे (वय २६ दोघेही रा. पाचपुतेवाडी, ता.वाई, जि. सातारा ) हे गंभीर जखमी झाले आहेत.

 अपघात होताच तिघांनाही रुग्णालयात नेले असता स्वप्नील चव्हाण हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तरुण काळोबा मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला मशालीवर तेल ओतण्यासाठी थांबले असता नासिक बाजूकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार ठोस देऊन अपघात केला. अपघातानंतर वाहन चालक टेम्पोसह फरार झाला. मंगळवारी पाचपुतेवाडी येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंडळाचे काही कार्यकर्ते शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. स्वप्नील हा पिंपरी-चिंचवड येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. तो याठिकाणी आपल्या बहिणीसोबत राहत होता. सागर तानाजी पाचपुते ( वय ३०, रा. पाचपुतेवाडी, ता.वाई, जि. सातारा ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८१/२०१८, भादंवि कलम २७९, ३३८, ३३७, ३०४ (२), ४२७, मोटार वाहन कलम १८४, १३४/१७७ नुसार टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपस करीत आहेत. 

Web Title: One person was killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.