किरकोळ कारणावरून पिंपरीतील चिखलीत एकाचा भोसकून खून; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:18 PM2017-12-23T15:18:10+5:302017-12-23T15:20:56+5:30

दोघांनी चिखलीत एका युवकावर चाकू हल्ला केला. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या युवकाचा त्यात जीव गेला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

One of the murderers killed in a chikhali, pimpri chinchwad; Both arrested | किरकोळ कारणावरून पिंपरीतील चिखलीत एकाचा भोसकून खून; दोघांना अटक

किरकोळ कारणावरून पिंपरीतील चिखलीत एकाचा भोसकून खून; दोघांना अटक

Next
ठळक मुद्देएका युवकावर चाकू हल्ला, एक जण गंभीर जखमीसानेवस्ती, चिखली येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली घटना

पिंपरी : तू माझ्याकडे का बघतो आहेस, अशी विचारणा करीत दोघांनी चिखलीत एका युवकावर चाकू हल्ला केला. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या युवकाचा त्यात जीव गेला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सानेवस्ती, चिखली येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दिनेश निवृत्ती पाटील (वय २५, रा. साने चौक) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तर अतुल अनिल गाडे वय (वय २५) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी समाधान रामदास मोरे (वय २४, मूळ रा. चाळीसगाव, जि. जळगाव) चेतन रामदास मोरे (वय २०) या आरोपीना अटक केली आहे. ते दोघे सख्खे भाऊ आहेत. 
दिनेश, अतुल, समाधान व चेतन हे चौघेही जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अतुल हा शुक्रवारी रात्री इमारतीच्या खाली उभा होता. मोबाईलवर बोलत असताना समाधानने त्याच्याकडे पहिले, त्यावेळी अतुलने माझ्याकडे का पाहतोस असे विचारले, त्याचा राग आल्याने मोरे बंधू दुसऱ्या मजल्यावरून खाली आले. या तिघांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद सुरू झाला. आवाज ऐकून समोरच्या इमारतीत राहणारा दिनेश पाटील खाली आला. तो वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करू लागला, त्यावेळी मोरे बंधूंनी दिनेश व अतुल या दोघांवर चाकू हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. यापैकी दिनेश याचा शनिवारी उपचारादरम्यान  मृत्यू झाला. तर अतुल याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिनेश व अतुल खासगी कंपनीत काम करतात. तर मोरे बंधू चप्पलच्या दुकानात कामाला आहेत. चौघेही सानेचौक मोरेवस्ती येथे चाळवजा इमारतीत  सध्या राहत आहेत. सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण तपास करीत आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये खूनसत्र सुरु असून किरकोळ कारणावरून घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: One of the murderers killed in a chikhali, pimpri chinchwad; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.