केरळ पूरग्रस्तांना एक कोटीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:28 AM2018-09-13T01:28:54+5:302018-09-13T01:28:56+5:30

अतिवृष्टीमुळे केरळमध्ये महापूर आला होता. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक व कर्मचा-यांनी पुढाकार घेतला आहे.

 One crore aid to Kerala flood victims | केरळ पूरग्रस्तांना एक कोटीची मदत

केरळ पूरग्रस्तांना एक कोटीची मदत

Next

पिंपरी : अतिवृष्टीमुळे केरळमध्ये महापूर आला होता. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक व कर्मचा-यांनी पुढाकार घेतला आहे. नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुमारे १ कोटी ६ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे बुधवारी मुंबईत सुपूर्त करण्यात आला.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे या सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांना महापालिकेच्या कर्मचाºयांनीही एक दिवसाचा पगार केरळ पूरग्रस्तांना देण्याची
उदारता दाखविली. महापालिका सर्वसाधारण सभेत केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याविषयी चर्चा
झाली. त्यानंतर जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय झाला.
पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याबद्दल कौतुक केले.

Web Title:  One crore aid to Kerala flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.