‘नॉनब्रॅण्ड’ उत्पादने बाजारात, कर चुकविण्यासाठी व्यापाºयांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:48 AM2017-08-29T06:48:03+5:302017-08-29T06:48:06+5:30

वस्तू व सेवा कर (जीएसटी)मधील तरतुदींमुळे ब्रॅण्डेड आणि नॉनब्रॅण्डेड अशी स्पर्धा धान्य बाजारात निर्माण झाली आहे. कर वाचविण्यासाठी काही कंपन्या ‘ब्रॅण्ड’ ऐवजी ‘नॉनब्रॅण्ड’ उत्पादन बाजारात आणू लागल्या आहेत

The 'nonbreand' products market, and the trade agreements to pay tax | ‘नॉनब्रॅण्ड’ उत्पादने बाजारात, कर चुकविण्यासाठी व्यापाºयांची धडपड

‘नॉनब्रॅण्ड’ उत्पादने बाजारात, कर चुकविण्यासाठी व्यापाºयांची धडपड

Next

भोसरी : वस्तू व सेवा कर (जीएसटी)मधील तरतुदींमुळे ब्रॅण्डेड आणि नॉनब्रॅण्डेड अशी स्पर्धा धान्य बाजारात निर्माण झाली आहे. कर वाचविण्यासाठी काही कंपन्या ‘ब्रॅण्ड’ ऐवजी ‘नॉनब्रॅण्ड’ उत्पादन बाजारात आणू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘ट्रेडमार्क’ मध्येही किरकोळ बदल करून मालाची विक्री करू लागले आहेत. ब्रॅण्डेड धान्यावर पाच टक्के जीएसटी लागू झाला आहे. त्याचवेळी ‘नॉनब्रॅण्ड’ धान्य करमुक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाºयांमधील संभ्रम दूर झाले नाहीत. त्यामुळे उत्पादकांनी शक्कल लढविण्यास सुरुवात केली आहे.
धान्याचा व्यापार हा केवळ दोन ते तीन टक्के नफ्याचा आहे़ पाच टक्के जीएसटी भरावा लागणार याचे गणित कसे बसवायचे, असा प्रश्न उत्पादक, घाऊक व्यापाºयांसमोर आहे. एकाच प्रतिचा माल ‘ब्रॅण्ड’च्या नावाखाली विकला तर करामुळे तो जास्त भावात विकावा लागेल. त्याचवेळी त्याच प्रतिचा माल ‘नॉनब्रॅण्ड’च्या नावाखाली विकला, तर तो कमी किमतीत ग्राहकांपर्यंत पोचेल. त्यामध्ये फायदाही अधिक मिळेल. यासाठी उत्पादकांनी पळवाट शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
ग्राहकांपुढे ठेवतायेत पर्याय
भोसरी परिसरातील एका स्थानिक डाळ उत्पादकाने ट्रेडमार्कमध्येच बदल केला असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक करू लागले आहेत. त्याने उत्पादनाच्या पॅकिंगवर ह्यट्रेडमार्कह्णचे नाव कायम ठेवले असून, त्यावरील चिन्हात थोडा बदल केला. याचप्रकारे आटा, बेसन आदी उत्पादकांनी ह्यपॅकिंगह्णवरील मजकुरातही बदल केला आहे. केवळ उत्पादकाचे नाव आणि मालाचे नाव एवढेच ठेवून माल विकण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे ह्यब्रॅण्डह्ण माल ह्यनॉनब्रॅण्डह्ण म्हणून विकण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी आपल्या मूळ ह्यब्रॅण्डह्णची विक्री जीएसटीकरासहित चालू ठेवली आहे. ग्राहकाला वाटले तर तो जीएसटीसह माल खरेदी करेल आणि त्याला जीएसटी नको असेल तर ह्यनॉनब्रॅण्डह्ण म्हणून आणलेला माल विकत घेईल, असे पर्याय निर्माण केले गेले आहेत.

Web Title: The 'nonbreand' products market, and the trade agreements to pay tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.