ताथवडेत धारदार शस्त्रांनी वार करून इसमाचा निर्घृण खून; पोलीस आरोपीच्या मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:19 IST2017-11-16T12:10:04+5:302017-11-16T12:19:37+5:30

ताथवडेत कोयत्याने आणि धारदार शस्त्रांनी वार करून इसमाचा निर्घृण खून केल्याची घटना सोनावणे वस्ती येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उघड झाली.

murder in Tathavade; Police is behind the accused | ताथवडेत धारदार शस्त्रांनी वार करून इसमाचा निर्घृण खून; पोलीस आरोपीच्या मागावर

ताथवडेत धारदार शस्त्रांनी वार करून इसमाचा निर्घृण खून; पोलीस आरोपीच्या मागावर

ठळक मुद्देसोनावणे वस्ती येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास घडला प्रकारआरोपींच्या मागावर पथक रवाना केले असून लवकर ते गजाआड करण्यात येतील : श्रीधर जाधव

वाकड : ताथवडेत मंगळवारी एकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेला एक दिवस होत नाही, तोच पुन्हा ताथवडेत कोयत्याने आणि धारदार शस्त्रांनी वार करून इसमाचा निर्घृण खून केल्याची घटना सोनावणे वस्ती येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उघड झाली. या प्रकाराने ताथवडेत एकच खळबळ उडाली आहे. सतीश गुलाब सोनवणे (वय ४०, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम वाकड ठाण्यात सुरु आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हा सोनवणे वस्ती येथे राहतो. रात्रीच्या सुमारास कोणी अज्ञातांनी त्याच्यावर कोयता आणि धारधार शस्त्रांनी वार केले. त्याच्या मानेवर आणि डोक्यात गंभीर वार आहेत. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात इसमाचा मृतदेह पडल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला आल्या. नंतर वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. 
भांडणातून हा प्रकार झाला असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून आरोपींच्या मागावर पथक रवाना केले असून लवकर ते गजाआड करण्यात येतील, असे वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी सांगितले.

Web Title: murder in Tathavade; Police is behind the accused