खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढविण्याबाबत संभ्रमात, परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे संकेत

By रोशन मोरे | Published: May 9, 2023 09:04 PM2023-05-09T21:04:53+5:302023-05-09T21:06:08+5:30

पुढील निवडणूक लढण्याबाबत निश्चित निर्णय अजून झाला नसल्याचे संकेत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिले.

MP Amol Kolhe question about contesting elections hints at taking a decision based on the situation loksabha shirur maharashtra | खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढविण्याबाबत संभ्रमात, परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे संकेत

खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढविण्याबाबत संभ्रमात, परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे संकेत

googlenewsNext

पिंपरी : पुढची निवडणुक लढायचीच आहे याची आसक्ती मी माझ्यावर करत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे औत खांद्यावर घेऊन फिरत नाही. वारा आणि आभाळ बघून शेत नांगरायचा निर्णय घ्यावा लागतो. त्यापेक्षा महत्वाचा मला वाटते की नांगरायचे आहे की नाही याचा निर्णय आधी घ्यावा लागतो. हा प्रश्न आधी सुटणं महत्वाचा आहे, अशा शब्दांत पुढील निवडणूक लढण्याबाबत निश्चित निर्णय अजून झाला नसल्याचे संकेत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिले. चिंचवडमध्ये दिशा सोशल फाऊंडेशनकडून खासदार कोल्हे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते जगन्नाथ (नाना) शिवले यांनी खासदार कोल्हे यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत आपल्या पुढील वाटचाली संदर्भात खासदार कोल्हे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, काही प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे आहे. मात्र, मला नेमकं सुख कशात मिळतं याचा विचार केला तर संसदेच ग्रीन कार्पेट, मानसन्मान एका पारड्यात आणि शिवाजी महाराजांचा जिरेटोप, कवड्याची माळ एक पारड्यात ठेवले तर त्याचे वजन जास्त भरेल. त्यामुळे पुढचे पुढे बघू. जेथे निवडणुकी लढण्याचे अजून निश्चित नाही तेथे पक्ष कोणता या चर्चेत फारसे तथ्थ नाही. आपण राष्ट्रवादीत यावे ही अजितदादांची इच्छा होती. त त्यांच्यामुळेच मी शिरुरचा खासदार झालो. त्यांनीच माझ्या निवडणुकीचे सर्व नियोजन केले. त्यांच्यामुळेच मी विजयी झालो, असे खासदार कोल्हे यांनी सांगितले.

भाजप की राष्ट्रवादीकडून उमेदवारी
पुढील निवडणुकीसाठी भाजप किंवा अन्य पर्यायाचा विचार करत आहे का? या प्रश्नावर कोल्हे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले ते म्हणाले, पाच वर्षांची जबाबदारी मतदारांनी माझ्यावर दिली होती. ती सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी तटस्थेने पाहिले तर राजकारणात येणाऱ्या तरुणांनी त्यांची बांधिलकी राजकीय पक्षांशी ठेवण्यापेक्षा जनतेशी ठेवावी.

जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतचा प्रश्नच चुकीचा
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावे, याबाबत चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत आहे. जयंत पाटील यांच्या मतदार संघातील कार्यक्रमात या प्रश्नावर उत्तर देताना मी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला. मला अजितदाद की जयंत पाटील असा प्रश्न विचारण्यात आला नाही. तसा प्रश्न विचारला असता तर उत्तर वेगळे असते

Web Title: MP Amol Kolhe question about contesting elections hints at taking a decision based on the situation loksabha shirur maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.