लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी केला विवाह, प्रेयसीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:48 IST2018-12-06T01:48:37+5:302018-12-06T01:48:43+5:30

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीबरोबर विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली.

 Married to another marriage, lover's suicide | लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी केला विवाह, प्रेयसीची आत्महत्या

लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी केला विवाह, प्रेयसीची आत्महत्या

पिंपरी : प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीबरोबर विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली. सांगवी येथील नयन गोविंद गार्डन, दत्त क्लासिक, पिंपळे गुरव येथील इमारतीवरून उडी मारून मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिने आत्महत्या केली.
याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. ईश्वरी बाबूराव पोकळे (वय २२, रा. पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत योगेश गोकुळ सोनावणे (रा. प्रिय अपार्टमेंट, सिडको, रामनगर, औरंगाबाद) असे
आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा बाबूराव पोकळे (वय ५०, रा. पैठण, औरंगाबाद) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुलै २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आरोपी सोनावणे याने ईश्वरी हिस लग्नाचे आमिष दाखविले. ते दोघेही एकाच खोलीत राहत होते. आरोपी योगेश याने दुसºयाच मुलीबरोबर विवाह ठरविला. याबाबत त्याने ईश्वरीला सांगितले. हा धक्का सहन न झाल्याने तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

Web Title:  Married to another marriage, lover's suicide