पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समिती अध्यक्षपदी ममता गायकवाड निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 01:55 PM2018-03-07T13:55:30+5:302018-03-07T13:55:30+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची निवडणूक बुधवारी (7 मार्च) दुपारी झाली. आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड यांची निवड झाली.

Mamta Gaikwad elected as standing Committee chairman of Pimpri-Chinchwad Municipal Corporation | पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समिती अध्यक्षपदी ममता गायकवाड निवड

पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समिती अध्यक्षपदी ममता गायकवाड निवड

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची निवडणूक बुधवारी (7 मार्च) दुपारी झाली. आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या ममता गायकवाड यांची निवड झाली. गायकवाड या स्थायी समितीच्या 34व्या अध्यक्ष आहेत.  स्थायी समितीमध्ये सोहळा सदस्य असून आमदार लक्ष्मण जगताप यांचे चार समर्थक असून त्यामध्ये ममता गायकवाड, सागर अंगोळकर, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे तर आमदार महेश लांडगे यांचे राहुल जाधव, लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, नम्रता लोंढे हे चार समर्थक नगरसेवक स्थायी समितीत सदस्य आहेत. त्याचबरोबर भाजपाचे निष्ठावान विलास मडिगेरी आणि शीतल शिंदे या दोघांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, प्रज्ञा खानोलकर आणि गीता मंचरकर, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांचा स्थायीत समावेश आहे. मडिगेरी, जाधव आणि  शिंदे यापैकी एकाची एकाची वर्णी लागेल अशी चर्चा होती. जुन्यांनाच संधी मिळेल असा दावाही काहींनी केला होता.

मात्र, शेवटच्या टप्यात आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची सरशी झाली. ममता गायकवाड यांना उमेदवारी दिली. गायकवाड या उमेदवारी दिल्याने आमदार महेश लांडगे गटावर अन्याय झाल्याने समर्थकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोरेश्वर भोंडवे हेही रिगणार उतरले होते. त्यांना शिवसेना आणि मनेसनेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपातील गटबाजीमुळे काय होणार याबाबत उत्सुकता होती.  बुधवारी (7 मार्च )दुपारी 12 वाजता अध्यक्षपदाची निवडणूक झाली. बंडखारी झालीच नाही. 11 मतांनी गायकवाड विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र  कृषि विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी काम पाहिले.

या निवडणुकीत ममता गायकवाड यां निवड करण्यात आली. ममता गायकवाड या प्रथमच नगरसेविका झाल्या असून त्यांचे पती विनायक गायकवाड हे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. आमदार जगताप समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते. सीमा सावळेंनंतर दुस-यांचा एस्सी गटातील गायकवाड यांना अध्यक्षपदी संधी मिळाली आहे. 


राजनामा म्यान 

आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांना स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावलल्याने आमदारांचे समर्थक नाराज झाले आहेत. महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिला आहे. तर, राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडाळी निर्माण झाली होती.  नाराज नगरसेवक मतदानाला हजर राहणार का?, भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करणार का?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्या पार्श्वभूमीवर बंडखोरीची चिन्हे होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आमदार महेश लांडगे यांची समजूत काढल्याने लांडगे समर्थकांनी राजीनामास्त्र म्यान केले. सर्वसदस्य उपस्थित होते. 

Web Title: Mamta Gaikwad elected as standing Committee chairman of Pimpri-Chinchwad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.