लोकमत 'लोक'जीबी विशेष: बंडखोर उमेदवार राहुल कलाटे पुन्हा विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार

By प्रमोद सरवळे | Published: March 7, 2024 01:23 PM2024-03-07T13:23:23+5:302024-03-07T13:24:20+5:30

मागील विधानसभेच्या निवडणुकीत कलाटे यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला होता

Lokmat Lok GB Special Rebel candidate Rahul Kalate to re enter assembly battle | लोकमत 'लोक'जीबी विशेष: बंडखोर उमेदवार राहुल कलाटे पुन्हा विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार

लोकमत 'लोक'जीबी विशेष: बंडखोर उमेदवार राहुल कलाटे पुन्हा विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार

पिंपरी : गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचे कामे होत नाहीत. त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी काम करत आहे असं, राहुल कलाटे म्हणाले. येत्या विधानसभा निवडणुकांत चिंचवडमधून निवडणूक लढवणार असल्याचे संकेतही कलाटे यांनी दिले. मागील पोटनिवडणुकीत बंडखोरी करून कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. लोकमत आयोजित  'लोकजीबी'ला राहुल कलाटे यांनीही हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना 1लाख 35 हजार 603 तर महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल तथा नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली होती. तर अपक्ष म्हणून लढलेले उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मतांवर समाधान मानावे लागले होते. मागील विधानसभेच्या निवडणुकीत कलाटे यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला होता. त्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला होता.

Web Title: Lokmat Lok GB Special Rebel candidate Rahul Kalate to re enter assembly battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.