अधिकारी देणार संपत्तीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 06:15 AM2017-09-01T06:15:10+5:302017-09-01T06:15:13+5:30

पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांतील आणि महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदेतील अ, ब आणि क गटातील अधिकारी आणि कर्मचाºयांची मालमत्ता आणि संपत्तीचा तपशील जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

Information Officer | अधिकारी देणार संपत्तीची माहिती

अधिकारी देणार संपत्तीची माहिती

Next

पिंपरी : पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांतील आणि महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदेतील अ, ब आणि क गटातील अधिकारी आणि कर्मचाºयांची मालमत्ता आणि संपत्तीचा तपशील जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी याबाबत मागणी केली होती.
थोरात यांच्या मागणीनुसार पुणे विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकाºयांची मालमत्ता आणि संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार विभागातील सर्व अधिकाºयांच्या मालमत्ता आणि संपत्तीचा तपशील जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, सरकारमधील आर्थिक पारदर्शकतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर केला आहे. त्यामुळे सरकारचे कामकाज अधिक पारदर्शी होण्यास मदत होत आहे. अशाच प्रकारे पुणे विभागातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, पीएमआरडीए आणि अन्य विभागांतील अधिकाºयांची संपत्ती जाहीर झाल्यास संबंधित ठिकाणचे कामकाज अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल; तसेच भ्रष्टाचाराला आळा बसून संबंधित कार्यालय आणि यंत्रणेच्या कामकाजात शिस्तबद्धता येईल, असे नमूद केले आहे.

Web Title: Information Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.