स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लाल फितीत, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; उद्योगनगरीत गुन्ह्यांची वाढली संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:55 AM2017-09-20T00:55:50+5:302017-09-20T00:55:53+5:30

वाढती लोकसंख्या, तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्तालय असावे, अशी गरज निर्माण झाली आहे. या मागणीचा रेटा वाढल्याने शासनाच्या गृहखात्याकडे प्रस्तावसुद्धा गेला आहे.

Independent Police Commissionerate, Red Fit; lack of political will; Increased number of industrialized crime | स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लाल फितीत, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; उद्योगनगरीत गुन्ह्यांची वाढली संख्या

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लाल फितीत, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; उद्योगनगरीत गुन्ह्यांची वाढली संख्या

Next

पिंपरी : वाढती लोकसंख्या, तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्तालय असावे, अशी गरज निर्माण झाली आहे. या मागणीचा रेटा वाढल्याने शासनाच्या गृहखात्याकडे प्रस्तावसुद्धा गेला आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभेत या मुद्द्यावर लक्ष्यवेधी मांडली गेली. गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वत: मंजुरीच्या घोषणा झाल्या. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी पाठपुरावा कमी पडला. त्यामुळे हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे.
महापालिका निवडणुकीला आठ महिन्यांचा कालावधी उलटला नाही, तोच राजकीय वैमनस्यातील गुन्हेगारी घटना वाढू लागल्या आहेत. माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचून अ‍ॅड. सुशील मंचरकर याने गुंडांना सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच दिवशी दुपारी काळेवाडीत गोळ्या झाडून संतोष कुरवत याच्या खुनाचा प्रयत्न झाला. महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून तो निवडणूक रिंगणात होता. त्याच्यावरील हल्ल्याची घटना ताजी असताना दुसºयाच दिवशी भोसरी गवळीमाथा येथे विजय पांडुरंग घोलप या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. अगदी अलीकडच्या काळात सलग घडलेल्या या गोळीबाराच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी घटनांचा आलेख जसजसा वाढतो आहे, तशी नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहरात पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
मागणीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला. तो शासनाच्या गृहखात्यापर्यंत पोहोचला आहे. गृहखात्याकडे आलेल्या चार प्रस्तावांत पिंपरी-चिंचवडचा प्रस्ताव होता. मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी जाहीर केले. आयुक्तालयाबद्दल उपस्थित लक्ष्यवेधीवर अधिवेशनात चर्चा झाली. प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी अर्थ विभागाकडे पाठविला असून, लवकरच तो संमत होईल, असे उत्तर गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन दिले होते. स्वतंत्र आयुक्तालयाचा प्रस्ताव मार्गी लागण्यास मुहूर्त मिळणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहेत.
> भौगोलिक विस्तार वाढणार
मनुष्यबळ आवश्यक असल्याने भरती प्रक्रिया करावी लागणार आहे. तसेच जागा, इमारत हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अर्थखात्याची मंजुरी मिळाल्यास पुढील मार्ग सुकर होणार आहे. पोलीस आयुक्तालय होणार अशी घोषणा गेले अनेक वर्षे केली जात आहे. परंतु प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने नेमके आयुक्तालय कधी सुरू होणार,यासाठी राजकीय इच्छाशक्तीच कमी पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आयुक्तालयाला मुहुर्त कधी याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Independent Police Commissionerate, Red Fit; lack of political will; Increased number of industrialized crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.