चाळकवाडी टोलवर अवैध वसुली सुरूच

By admin | Published: June 12, 2017 01:19 AM2017-06-12T01:19:39+5:302017-06-12T01:19:39+5:30

पुणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या व्यावसायिक वाहनांसाठी टोलमधून ५० टक्के सवलत आहे़ ही सवलत वाहनांना द्यावी व तत्काल दुरुस्ती फलक लावावा

Illegal recovery on Chalakwadi toll | चाळकवाडी टोलवर अवैध वसुली सुरूच

चाळकवाडी टोलवर अवैध वसुली सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : पुणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या व्यावसायिक वाहनांसाठी टोलमधून ५० टक्के सवलत आहे़ ही सवलत वाहनांना द्यावी व तत्काल दुरुस्ती फलक लावावा, असे आदेश भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत चाळकवाडी येथील टोलनाक्यावर १०० टक्के टोलवसुली सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून टोलवर वाहनचालकांची लूट होत आहे़
वाहनचालकांची फसवणूक करून १०० टक्के रक्कम वसूल
करत असल्याचे वृत्त दि़ ११ मे २०१७ रोजी दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते़ या वृत्ताची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुमित मुखर्जी यांनी टोलधारक कंपनीचे उपाध्यक्ष यांना करारातील दरानुसार टोल दुरुस्ती करून आकारणी करण्यात यावी व लावण्यात आलेल्या फलकामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, असा आदेश दिला होता.
कंपनीनेदेखील दोन दिवसांत दुरुस्ती फलक लावण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, या घटनेला २३ दिवस उलटूनही अद्याप दुरूस्ती फलक लावण्यात आलेले नाहीत़
खेड ते सिन्नर दरम्यान चाळकवाडी व हिवरगाव पावसा येथे टोलनाके सुरू करण्यात आले आहेत़ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वतीने खेड-सिन्नस एक्सप्रेस लि़ मधील चाळकवाडी व हिवरगाव पावसा येथे टोलनाका सुरू करण्यासंदर्भात अधिसूचना जाहीर करून वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली़़
अधिसूचना व वृत्तपत्रानुसार पुणे जिल्ह्यातील नोंदणीकृत असलेल्या व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत टोलमधून देण्यात आली आहे़ त्यानुसार चाळकवाडी टोलनाक्यावर पुणे जिल्ह्यातील एम़ एच़ १४, एम़ एच़ १२ व एम़ एच़ ४२ या वाहनांना ५० टक्के सवलत टोलमधून मिळणे अपेक्षित होते़
मात्र टोलनाक्यावर १०० टक्के टोल घेण्यात येत होता़ चाळकवाडी येथे लावण्यात आलेल्या फलकामध्ये सवलतीचा उल्लेख नसल्याने व गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून सवलत न देता वसुली सुरू असून वाहनचालकांची फसवणूक होत असून, याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे़

Web Title: Illegal recovery on Chalakwadi toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.