पतीने पत्नीला रुग्णालयातच केली मारहाण ; हिंजवडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 17:10 IST2018-12-09T17:09:12+5:302018-12-09T17:10:35+5:30
रूग्णालयात उपचारासाठी पत्नीला दाखल केले असताना, तेथे जाऊन तिला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीला हटकले असता, त्याने डॉक्टरांनाही शिवीगाळ केली.

पतीने पत्नीला रुग्णालयातच केली मारहाण ; हिंजवडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : रूग्णालयात उपचारासाठी पत्नीला दाखल केले असताना, तेथे जाऊन तिला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीला हटकले असता, त्याने डॉक्टरांनाही शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर रूग्णालय्याची काच फोडुन डॉक्टरांना धमकावले. या प्रकरणी राहुल सुभाष उभे (वय ३०,) या आरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल अंकुश धायगावे (वय ३०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पत्नी उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्णालयात आरोपीने गोंधळ घातला. पत्नी प्रियंकाला मारहाण, शिवीगाळ करू लागला. डॉ. वंदना अंभोरे यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशीही आरोपीने हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर धावुन गेला. शिवीगाळ केली. तसेच रूग्णालयाच्या काचेवर फटका मारला. फिर्यादीच्या कपाळाला त्यामुळे जखम झाली. त्यांनतर आरोपीने तेथून पलायन केले. एवढ्यावर न थांबता मोबाईलवरून डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना शिवीगाळ केली. धमकीसुद्धा दिली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.